Maize Export : भारत बनतोय मका निर्यातीचे केंद्र; पाच वर्षांत निर्यातीत पाच पटीने वाढ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील मकाची मागणी दिवसेंदिवस वाढत असून, विदेशांमध्ये मका निर्यात (Maize Export) करण्यातही भारताने मागणी पाच वर्षांमध्ये मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे आता भारताला मका निर्यातीचे केंद्र म्हटले जाऊ लागले आहे. मका या पिकातून मिळणाऱ्या विदेशी चलनाचा विचार करता गेल्या पाच वर्षांमध्ये देशातील मका निर्यातीत (Maize Export) पाच पटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे.

तांदूळ आणि गहू पिकानंतर मका हे देशातील तिसरे महत्वाचे पीक बनले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2018-19 मध्ये 1,872 कोटी रुपयांचे परकीय चलन भारताला मका निर्यातीतून (Maize Export) मिळाले होते. ज्यात यावर्षी पाच पटीने वाढ झाली असून, 2022-23 यावर्षी जवळपास 8,987 कोटींचे परकीय चलन भारताला मका निर्यातीत मिळाले आहे. भारत जगभरात 34 लाख 53 हजार 680 मेट्रिक टन इतकी वार्षिक मका निर्यात करतो. विदेशांमध्ये भारतीय मकाचा वापर प्रामुख्याने आहारात आणि पोल्ट्री खाद्य बनवण्यासाठी केला जातो. आफ्रिकी देशांमध्ये अन्नद्यान्याची टंचाई निर्माण होत असल्याने त्या ठिकाणी भारतीय मकाला मोठी मागणी असते.

इथेनॉल निर्मितीमुळे मागणी (Maize Export Five Times Increase)

मकाला देशातंर्गत बाजारात देखील मोठी मागणी असते. देशातील पोल्ट्री उद्योगातील झालेल्या भरभराटीमुळे मकाला पशु खाद्य तयार करण्यासाठी विशेष मागणी आहे. त्यामुळे वर्षभर मकाला बाजारात मागणी राहत असून, मकाचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळतात. त्यातच अलीकडे इथेनॉल निर्मितीला चालना दिली जात असल्याने, आणि ऊस उत्पादनात घट होण्याच्या पार्श्वभूमीवर मका उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे.

प्रमुख मका उत्पादक राज्य

देशामध्ये प्रामुख्याने आंध्र प्रदेश (20.9 टक्के), कर्नाटक (16.5 टक्के), राजस्थान (9.9 टक्के), महाराष्ट्र (9.1 टक्के), बिहार (8.9 टक्के), उत्तर प्रदेश (6.1 टक्के), मध्य प्रदेश (5.7 टक्के), हिमाचल प्रदेश (4.4 टक्के) मका उत्पादन घेतले जाते. या राज्यांमधील मका उत्पादन हे देशातील एकूण मका उत्पादनापैकी 80 टक्के इतके आहे. याशिवाय छत्तीसगड, झारखंड, गुजरात या राज्यांमध्ये देखील मकाचे उप्तादन घेतले जाते.

error: Content is protected !!