Maize Import : तुरीनंतर म्यानमारची मका भारतात येणार; आयातीसाठी चाचपणी सुरू!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील मका उत्पादकांना सुगीचे दिवस आले असून, इथेनॉल निर्मितीसाठी मक्याची (Maize Import) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र स्वदेशी मका वापर केल्यास देशांतर्गत मक्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. यामुळे आयतदारांकडून म्यानमार या देशातून मका आयात करण्याबाबत चाचपणी सुरू झाली आहे. त्यामुळे आता तुरीनंतर म्यानमारमधून भारतात मोठ्या प्रमाणात मका आयात (Maize Import) होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

देशांतर्गत दरवाढीची भीती (Maize Import From Myanmar)

केंद्र सरकारने वर्ष 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याचे निश्चित केले आहे. मात्र यावर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने देशातील ऊस उत्पादनात घट नोंदवली गेली आहे. देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमतींमध्ये वाढ होऊ नये, यासाठी केंद्र सरकारकडून उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात आली आहे. परिणामी केंद्र सरकारला आपले इथेनॉल निर्मितीचे लक्ष्य पूर्ण करण्यात व्यत्यय निर्माण झाला आहे. त्यामुळे इथेनॉल उद्योगाकडून आणि आयतदारांकडून म्यानमारची मका आयात करण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचे अधिकृतरित्या सांगितले जात आहे.

इथेनॉल उद्योगाची कोंडी

दरम्यान, केंद्र सरकारने अलीकडेच इथेनॉल निर्मितीसाठी राखीव साठ्यातील तांदूळ वापरण्यास मनाई केली आहे. त्यातच देशातील ऊस उत्पादन ही घटले आहे. परिणामी इथेनॉल निर्मिती उद्योग संकटात सापडला आहे. त्यामुळे म्यानमार या देशातून मका आयात करण्यासाठी इथेनॉल उद्योग आणि आयतदारांकडून योजना बनवण्यात आली आहे. त्यानुसार, आयतदारांकडून म्यानमारसोबत बोलणी सुरू असल्याचे बोलले जात आहे.

मर्यादित साठा शिल्लक

यावर्षी देशातील काही राज्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने, मका उत्पादन प्रभावित झाले आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये एकरी मका उत्पादनात मोठी घट नोंदवली गेली आहे. त्यातच सध्या देशात मक्याचा मर्यादित साठा शिल्लक आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी विदेशातून मोठ्या प्रमाणात मका आयात करण्याची गरज असल्याचे इथेनॉल निर्मिती उद्योगातून सांगितले जात आहे.

error: Content is protected !!