Maize Market Rate : मकाच्या दरात सुधारणा; देशातंर्गत मागणी वाढल्याने दर तेजीत राहणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील मका उत्पादक शेतकऱ्यासांठी आनंदाची बातमी असून, सर्वच बाजार समित्यांमध्ये सध्या मकाचे दर (Maize Market Rate) काहीसे वाढलेले पाहायला मिळत आहे. महिनाभरापूर्वी मकाला राज्यात 1700 ते 2100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत होता. मात्र, सध्या राज्यातील काही निवडक बाजार समित्या वगळता, सर्वच बाजार समित्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात कमाल 2300 रुपये तर सरासरी 2200 ते 2300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे काही भागांमध्ये पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांच्या उन्हाळी मका पिकाला या दरवाढीचा (Maize Market Rate) मोठा फायदा होणार आहे.

रब्बी उत्पादकांना फायदा होणार (Maize Market Rate Increase)

खरीप हंगामात एल-निनोच्या प्रभावामुळे अनेक भागात कमी पाऊस झाल्याने एकरी उत्पादनात मोठी घट दिसून आली. मात्र, राज्यातील काही भागांमध्ये कालव्याद्वारे आवर्तने सोडली जात असल्याने, सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी रब्बी मका लागवड केली. ही मका सध्या मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे झालेली ही दरवाढ रब्बी मका उत्पादकांच्या पथ्यावर पडणार आहे. कारण, पाहिजे तितकी आवक न झाल्यास मका दरातील वाढ (Maize Market Rate) कायम राहून, या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

का होतीये दरवाढ?

मका बाजारात सध्या पुरवठा कमी आणि मागणी अधिक अशी परिस्थिती आहे. पोल्ट्री उद्योगाला सध्या मकाचा पुरवठा होत नसल्याची ओरड आहे. त्यातच केंद्र सरकारने इथेनॉल उद्योगासाठी मकाचा वापर वाढवण्यावर भर दिला आहे. अर्थात पोल्ट्री उद्योग, पशु खाद्य उद्योग, स्टार्च उद्योग आणि इथेनॉल अशी चोहूबाजूने मकाला देशातंर्गत मागणी वाढली आहे. याउलट यंदा पावसाअभावी राज्यासह देशभरात खरिपातील मका उत्पादनात उत्पादनात मोठी घट नोंदवली गेली आहे. परिणामी, बाजारात सध्या मकाचा पुरवठा कमी असल्याने हळूहळू दरवाढ होताना दिसून येत आहे. अशातच आगामी काळात मकाचे वाढतेच राहणार असल्याचे मका व्यापारातील जाणकारांकडून सांगितले जात आहे.

error: Content is protected !!