Maize Production : पाच वर्षात मका उत्पादन 10 दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात आगामी काळात मका पिकाचे (Maize Production) महत्व मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. इथेनॉल निर्मिती व्यवसायाची भरभराट झाल्याने, मकाला महत्व प्राप्त झाले आहे. तसेच पोल्ट्री व्यवसायात देखील मकाला मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे आता येत्या पाच वर्षांमध्ये सरकारकडून मका उत्पादनात 10 दशलक्ष टनांपर्यंत वाढ करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. मका उत्पादनाद्वारे ‘फार्म टू फ्यूल’ नावाची महत्वाकांक्षी योजना राबविली जाणार आहे. असे भारतीय कृषी संशोधन संस्थेचे वैज्ञानिक (Maize Production) अशोक सिंह यांनी म्हटले आहे.

32.47 दशलक्ष टन मका उत्पादन (Maize Production 10 Million Tons In Five Years)

मका हे गहू आणि धान पिकानंतर देशातील तिसरे सर्वात महत्वाचे पीक आहे. 2022-23 मध्ये देशात एकूण 34.6 दशलक्ष टन मका उत्पादन (Maize Production) नोंदवले गेले आहे. जे 2021-22 मध्ये 33.7 दशलक्ष टन नोंदवले गेले होते. तर 2023-24 मध्ये देशातील मका उत्पादन 32.47 दशलक्ष टन इतके नोंदवले गेले होते. सरकारच्या जैवइंधन धोरणानुसार, येत्या काळात उसापासून इथेनॉल निर्मिती कमी करण्यावर भर दिला आहे. तर इथेनॉलनिर्मितीसाठी अधिकाधिक मका पिकाचा वापर केला जाणार आहे.

20 टक्के मिश्रणाचे लक्ष्य

इथेनॉल निर्मितीसाठी ऊस, तांदूळ आणि मका यांसारख्या पिकांचा उपयोग केला जाणार आहे. सध्याच्या घडीला देशातील जवळपास 25 टक्के इथेनॉलची निर्मिती उसापासून केली जाते. तर 25 टक्के इथेनॉल निर्मिती अन्नधान्यापासून केली जाते. त्यामुळे सध्या इथेनॉलनिर्मिती वाढवण्यावर भर देण्यासाठी मकाची हमीभावाने सरकारी खरेदी करण्यासाठी भर दिला जात आहे. या नवीन धोरणानुसार, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी वर्ष 2025-26 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकरी ऊर्जादाता बनणार

भारतामध्ये गहू आणि धानानंतर मका हे सर्वात महत्वाचे पीक आहे. मकाचा उपयोग देशाची ऊर्जासुरक्षा मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आता मका उत्पादक (Maize Production) शेतकऱ्यांना अन्नदाता नाही तर ऊर्जादाता म्हटले जाऊ लागले आहे. सरकारकडून मकाचा उपयोग देशातील इंधन मिश्रणासाठी केला जात आहे. परिणामी आता आगामी काळात मका बियाणे संशोधकांकडून अधिक उत्पन्न देणाऱ्या जातींच्या लागवडीसाठी प्रयत्न केला जाणार आहे.

error: Content is protected !!