Maize Purchase for Ethanol Production: मका उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी; इथेनॉल निर्मितीसाठी होणार मक्याची खरेदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: इथेनॉल निर्मितीच्या (Maize Purchase for Ethanol Production)संदर्भात केंद्र सरकारनने मोठा निर्णय घेतला असून इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यासाठी आता उसाऐवजी मका पिकांचा जास्त वापर केला जाणार आहे. साखरेची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं आता उसाऐवजी मका अधिक वापरण्याचं धोरण स्वीकारलं आहे. त्यामुळं आता मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती ही मक्यापासून (Maize Purchase for Ethanol Production)केली जाणार आहे. 

सहकारी संस्थांकडून ठराविक दराने केला जाणार मका पुरवठा (Maize Purchase for Ethanol Production)

मक्यापासून इथेनॉल बनवण्याबाबत सरकारने मोठा बदल केला आहे. आता इथेनॉल निर्मात्यांना सहकारी संस्थांकडून ठराविक दराने मक्याचा पुरवठा केला जाणार आहे. एकीकडे, या बदलामुळं इथेनॉलचे अखंड उत्पादन सुनिश्चित होईल, तर दुसरीकडे बाजारात साखरेची उपलब्धता सुनिश्चित करण्यात मदत होईल. साखरेचं उत्पादन कमी होऊ नये म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. कारण यावर्षी साखरेच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी झालं आहे, तर काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळं साखर उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. या कारणामुळं मक्यापासून इथेनॉल (Maize Purchase for Ethanol Production) निर्मितीला सरकार चालना देत आहे. 

दरम्यान सरकारनं सहकारी संस्था नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) यांना इथेनॉल तयार करण्यासाठी यावर्षी 2,291 रुपये प्रति क्विंटल दराने मका पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे. दोन्ही सहकारी संस्था 2023-24 या पीक वर्षात 2,090 रुपये प्रति क्विंटल या किमान आधारभूत किंमतीवर मका खरेदी करतील आणि इथेनॉल निर्मात्यांना 2,291 रुपये प्रति क्विंटल दराने पुरवठा करतील.

सध्या देशात इथेनॉल बनवण्यासाठी प्रामुख्यानं उसाचा वापर केला जात आहे. बाजारातील मागणीच्या तुलनेत साखरेचा कमी पुरवठा यामुळे साखरेच्या दरात वाढ झाली आहे. सरकारनने साखर दरात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर कारखान्यांना इथेनॉल बनवण्यासाठी उसाऐवजी मक्याचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, वर्ष 2023-24 (ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2024) दरम्यान देशातील साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सरकार खबरदारीच्या उपाययोजना करत आहे. साखर उत्पादनासाठी उसाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, सरकार पर्याय म्हणून मक्याला प्रोत्साहन देत आहे. यामुळेच सरकारने अलीकडे मक्याच्या पुरवठ्यात बदल केले आहेत.

देशात मक्याचे 22.48 दशलक्ष टन उत्पादन अपेक्षीत 

जुलै 2023 ते जून 2024 दरम्यान म्हणजेच 2023-24 पीक वर्षात देशातील मका उत्पादन 22.48 दशलक्ष टन अपेक्षित आहे. ही आकडेवारी कृषी मंत्रालयाने आपल्या पहिल्या प्रगत अंदाजात दिली आहे. त्याचवेळी, तेल कंपन्यांनी कॉर्नपासून बनवलेले इथेनॉल खरेदीचे दर 5.79 रुपये प्रति लिटर केले आहेत.

केंद्र सरकारने जूनपासून उसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली होती. या निर्णयानंतर देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असे मानले जात होते. मात्र, या निर्णयाला मोठा विरोध झाला होता. यानंतर सरकारनं उसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल (Ethanol) निर्मिती करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळं 17 लाख टनापर्यंत साखरेचे इथेनॉल निर्मितीसाठी (Maize Purchase for Ethanol Production) वापर करण्यास साखर कारखानदारांना मुभा दिली होती. 

error: Content is protected !!