Maize Purchase : केंद्र सरकारकडून 1 लाख टन मका खरेदीचा प्रस्ताव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील साखर उत्पादनात घट नोंदवली जात असल्याने, सरकारने कडक निर्बंध लादत (Maize Purchase) उसापासून इथेनॉल निर्मितीवर पूर्णतः बंदी घातली आहे. त्यामुळे आता सरकारकडून इथेनॉल निर्मिती उद्योगाना पुरवठा करण्यासाठी किमान आधारभूत किमतीने (Maize Purchase) मोठ्या प्रमाणात मका खरेदी केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने 1 लाख टन मका ही सरकारच्या खरेदी संस्थाकडून केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या वरिष्ठ पातळीवर अधिकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारकडून ही मका खरेदी नाफेड, राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ, कृषी सहकारी संस्थांच्या माध्यमातून (Maize Purchase ) केली जाणार आहे. संसदेच्या स्थायी समितीच्या अहवालानुसार, मका हे पीक उसानंतर 380 लिटर प्रति टन इथेनॉल निर्मिती होऊ शकणारे दुसऱ्या क्रमांकाचे पीक आहे. मागील काही दिवसांमध्ये सरकारी खरेदी थांबल्याने मका बाजारभावाला काही प्रमाणात उतरती कळा लागली होती. मात्र आता सरकारच्या या धोरणामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मका पिकास कमी पाणी लागत असल्याने, तसेच त्याचा सामान्यांच्या आहाराशी थेट संबंध येत नसल्याने हा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते आहे.

मका उत्पादनात वाढ (Maize Purchase From Central Government)

2022-23 यावर्षीच्या हंगामात मका उत्पादन 35 दशलक्ष टनांवर पोहचले आहे. जे 2019-20 यावर्षीच्या हंगामात 29 दशलक्ष टन इतके नोंदवले गेले होते. त्यामुळे यावर्षी पावसाअभावी उसासह साखर उत्पादन घटणार असल्याने, 1 लाख टन मका खरेदीच्या प्रस्तावावर शिक्का मोर्तब करण्यात आले आहे. दरम्यान, मागील तीन ते चार वर्षांमध्ये मका उत्पादनात वाढ झाली असली तरी जागतिक उत्पादनाच्या तुलनेत भारतातील प्रति हेक्टरी मका उत्पादन हे कमी आहे. सध्यस्थितीमध्ये देशातील मका उत्पादन हे प्रति हेक्टरी 40 ते 50 प्रति क्विंटल इतके आहे. जे वैश्विक पातळीवर प्रति हेक्टरी 60 ते 80 क्विंटल इतके आहे.

error: Content is protected !!