Maize Rate : भारतीय मका दर वाढीचा फायदा पाकिस्तानला; वाचा.. नेमका कसा तो?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी (Maize Rate) ऊस वापरण्यास निर्बंध घातले आहेत. ज्यामुळे देशात इथेनॉल निर्मितीत मकाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच मागील वर्षी मान्सूनचा पाऊस तुलनेने कमी झाल्याने, देशातील खरीप हंगामातील मका उत्पादनात जवळपास 3 दशलक्ष टनाने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत जागतिक बाजारात मकाचे दर कमी असताना, देशातंर्गत बाजारात भारतीय मकाचा दर (Maize Rate) अधिक आहे. ज्यामुळे सध्या आंतरराष्ट्रीय मका बाजारात शेजारील पाकिस्तानची चांदी झालेली पाहायला मिळत आहे.

पाकिस्तानला फायदा (Maize Rate Pakistan Benefits)

मका बाजारातील जाणकारांच्या मते, सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय मका अधिक दराने (Maize Rate) विकला जातोय. कारण भारतीय मकाला इथेनॉल निर्मितीमुळे मागणी वाढल्याने, देशांतर्गत बाजारात अधिक दर मिळत आहे. आपल्या देशातील या स्थितीचा फायदा शेजारील पाकिस्तान या देशाला होत आहे. दक्षिण-पूर्व आशियातील देशांना पाकिस्तानी खरेदिदारांकडून मका खरेदी करणे स्वस्त पडत आहे. मात्र, असले पाकिस्तानी मकाची गुणवत्ता तुलनेने कमी आहे. मात्र असे असले तरी तुलनेने स्वस्त असल्याने भारतीय मकाचे पारंपारिक खरेदीदार देश पाकिस्तानी मका खरेदीसाठी धाव घेत आहेत.

स्वस्तात विकतोय मका

सध्या घडीला भारतातील मका दर (Maize Rate) हे सर्व देशभरात 2,150 रुपये प्रति क्विंटलच्या वरती आहे. अर्थात डॉलरचा विचार करता मकाची किंमत 260 डॉलर प्रति टन इतकी आहे. याउलट जागतिक बाजारात भारतीय मका 300 डॉलर प्रति टन इतक्या अधिक दराने विकला जात आहे. तर पाकिस्तान मात्र जागतिक बाजारात आपली मका 240 ते 250 डॉलर प्रति टन दराने विक्री करत आहे. अर्थात भारतीय रुपयात विचार करता पाकिस्तानी मका सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात 2,016 रुपये प्रति क्विंटल दराने मिळत आहे. ज्यामुळे सध्या व्हियेतनाम, मलेशिया आणि श्रीलंका या देशांनी स्वस्तात मका खरेदीसाठी पाकिस्तानकडे मका मोर्चा वळवला आहे.

‘या’ कारणांमुळे भारतीय मका दर अधिक

खरीप आणि रब्बी हंगामात यावर्षी मका उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत कमी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी ऊस वापरास प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मितीसाठी मकाला देशांतर्गत मागणी वाढली आहे. याशिवाय पोल्ट्री आणि स्टार्च सेक्टरमध्ये देखील मकाची मागणी मोठया प्रमाणात वाढली आहे. ज्यामुळे देशांतर्गत बाजारात मकाच्या किमती वाढल्या आहे. परिणामस्वरूप, आंतराराष्ट्रीय पातळीवर भारताचा मका तुलनेने महागला आहे.

error: Content is protected !!