Maka Lashkari Ali: सावधान! खानदेशात मका पि‍कावर झालाय मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव! लवकर हे करा उपाय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :राज्यातील मका उत्पादकांना मागील काही वर्षात लष्करी अळीची (Maka Lashkari Ali) चिंता सतावत आहे. मागील काही वर्षात या पिकाने मक्याचे 20 ते 60 टक्के पर्यंत नुकसान केले आहे. या वर्षी सुद्धा विशेषतः खानदेशात बहुतेक भागात या अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे.  गाव पातळीवर लष्करी अळीच्या (Maka Lashkari Ali) नियंत्रणासाठी सामूहिक आणि एकात्मिक नियंत्रण उपाय करणे गरजेचे आहे. तर जाणून घेऊ या उपायांबद्दल.  

नुकसानीचा प्रकार (Maka Lashkari Ali)

 • मका पिकात रोपावस्थेत पहिल्या व दुसऱ्या अवस्थेतील अळ्या पाने खरवडून खातात. त्यामुळे पानावर पांढरे लांबट चट्टे दिसायला लागतात.
 • लहान रोपांवर अशी लक्षणे दिसल्यास प्रादुर्भाव आहे असे समजावे व नियंत्रणाचे उपाय योजावेत.
 • अळी तिसऱ्या अवस्थेत पोंग्यामध्ये प्रवेश करून पाने खाण्यास सुरवात करते. या अवस्थेत पानांवर छिद्रे दिसतात.
 • पाचव्या अवस्थेत पोंग्यामध्ये राहून पाने खाते. त्यामुळे पानांवर मोठी छिद्रे दिसायला लागतात.
 • सहाव्या अवस्थेत अळी अधाशीपणे पाने खाऊन पोंग्यामध्ये मोठ्या प्रमाणात विष्ठा टाकते. या अवस्थेत मक्‍याची पाने झडल्यासारखी दिसतात.
 • तुरा आणि कणीस भरण्याच्या अवस्थेत आर्थिक नुकसान अधिक असते. अळी कणसात प्रवेश करून दाण्यांवर उपजीविका करते. आणि मधुमकावर जास्त प्रमाणात प्रादुर्भाव बघायला मिळतो.

रासायनिक नियंत्रण (Maka Lashkari Ali)

 • अळीच्या वाढीच्या पहिल्या अवस्थांमध्ये कडुनिंबावर आधारित कीटकनाशक (1500 पीपीएम) 5 मि.लि. किंवा  थायमेथोक्झाम (12.6 टक्के) + लॅम्बडा सायहेलोथ्रीन (9.5 टक्के झेड सी)  संयुक्त कीटकनाशकाची 0.5 मि.लि. प्रति लिटर पाणी फवारणी करा.
 • प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट (5 एस.जी.) 0.4 ग्रॅम किंवा स्पिनोसॅड (45एस. सी.) 0.3 मि.लि. किंवा भाताचा भुसा 10 किलो आणि गूळ 2 किलो पाण्यात एकत्र करून त्याचे गोळे तयार करावेत. दुसऱ्या दिवशी त्यामध्ये थायोडीकार्ब (75 डब्ल्यू.पी.) 100 ग्रॅम मिसळावे. या मिश्रणाच्या लहान गोळ्या तयार करून मक्याच्या पोंग्यात टाका.
 • कीड पतंग अवस्थेत असल्यास एकरी 15 कामगंध सापळे स्पोडोल्युरसह लावा यामुळे  नर पतंग मारले जाईल. अंडी घालण्याचे प्रमाण कमी होऊन किडीची संख्या कमी करता येऊ शकते. सर्व शेतकऱ्यांनी हे सापळे लावून मास ट्रॅपिंग करावे.
 • लष्करी अळीचे (Maka Lashkari Ali) पतंग निशाचर असून प्रकाशाकडे आकर्षित होत असल्याने या किडींचे पतंग प्रकाश सापळ्यात पकडून मारता येऊ शकतात. सगळ्या शेतकऱ्यांनी हे प्रकाश सापळे लावावेत. 
 • अंडीपुंज, समुहातील लहान अळया आणि मोठ्या अळ्या हाताने वेचून राॅकेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.

एकात्मिक नियंत्रण उपाय (Integrated Management of Maka Lashkari Ali)

मका पिकावरील लष्करी अळीचा (Maka Lashkari Ali) प्रादुर्भाव नेहमीच होत असलेल्या भागात सुरुवातीपासूनच  खालील उपायांचा अवलंब केल्यास पुढे या अळीमुळे होणारे मोठे नुकसान टाळता येईल.

 • पीक लागवडी अगोदर जमिनीची खोल नांगरट करावी त्यामुळे किडीची कोषावस्था प्रखर सूर्यप्रकाशाच्या तसेच पक्षांच्या संपर्कात येऊन मरून जाते.
 • शेतात मका पिकानंतर भुईमूग अथवा सूर्यफुलाची लागवड करावी.
 • पाऊस पडल्यानंतर लगेच पेरणी करावी. उशिरा पेरणी टाळावी.
 • शक्य असल्यास एकाच वेळी पेरणी करावी यामुळे एका प्रदेशातील मका एकाच वेळी वाढतो. किडीला प्रत्येक वाढीच्या अवस्थेतील मका उपलब्ध होत नाही.
 • मक्यासोबत तूर, उडीद, किंवा मूग यासारखी आंतरपीक घ्यावी.
 • वेळेवर कोळपणी व खुरपणी करून शेत तण मुक्त ठेवावे.
 • मक्याच्या शेतात सापळा पीक म्हणून बाजूने नेपिअर गवताची लागवड करावी.
 • किडींचे नैसर्गिक शत्रू जसे परभक्षी (ढालकिडा, मोठ्या डोळ्याचा ढेकूण इत्यादी) व परोपजीवी कीटक (ट्रायकोग्रामा, टिलोनेमस, कॅम्पोलेटीस इत्यादी) यांचे संवर्धन करावे.
 • मका पेरणीनंतर लगेच एकरी दहा पक्षी थांबे उभारावेत.
 • पानांवर दिसणारे अंडीपुंज व सुरवातीच्या अवस्थेतील अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
 • किडीच्या सर्वेक्षणासाठी पीक उगवून येण्यापूर्वी एकरी पाच कामगंध सापळे लावावेत.
 • ट्रायकोग्रामा किंवा टीलेनोमस रेमस यांनी परोपजीवीग्रस्त 50,000 अंडी प्रति एकर एक आठवड्याच्या अंतराने 3 वेळा शेतात सोडावे.
 • नर पतंग पकडण्यासाठी हेक्‍टरी 15 कामगंध सापळे लावावेत.
 • पोंगा व्यवस्थित तयार होईल त्या वेळी माती आणि राख किंवा चुना यांचे 9:1 या प्रमाणात मिश्रण घेऊन त्यात टाकावे. त्यामुळे पोंग्यातील अळ्यांवर परिणाम होतो.
 • मधु मका किंवा बेबी कॉर्नमध्ये 1500 पीपीएम अझाडीरेक्टीन पाच मिलि प्रति लिटर पाणी प्रमाणात घेऊन सुरवातीच्या वाढीच्या काळात फवारणी घ्यावी.
 • प्रादुर्भाव दिसू लागताच जैविक कीटकनाशक नोमुरिया रिलाई 3 ग्रॅम किंवा मेटॅऱ्हायझियम ॲनीसोप्ली 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 • लष्करी अळीचा (Maka Lashkari Ali) प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या वर गेल्यास खालील कीटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. द्रावण पोंग्यात जाईल याची काळजी घ्यावी
error: Content is protected !!