Malabari Goat Breed: उष्ण हवामानात सुद्धा तग धरून राहणारी ‘मलबारी शेळी’, जाणून घ्या वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: भारत हा मुख्यत: उष्णकटिबंधीय प्रदेश आहे. त्यामुळे (Malabari Goat Breed) आपल्याकडे उष्ण वातावरणात जुळवून घेणाऱ्या जनावरांच्या जाती पाळण्यास प्राधान्य दिले जाते. शेळ्यांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास काही जाती भारतातील उष्ण हवामान कणखरपणे सहन करतात. शेळीची अशीच एक जात म्हणजे मलबारी शेळी. या शेळीला तेलीचेरी शेळी (Tellicherry Goat) या नावाने सुद्धा ओळखतात. जाणून घेऊ या या शेळीची वैशिष्ट्ये.

उगमस्थान (Malabari Goat Breed)

मलबारी शेळीचे उगमस्थान केरळ राज्यातील मलबार जिल्हा हे आहे. कदाचित यामुळेच या शेळीला मलबारी शेळी असे नाव पडले आहे. या शेळ्या दूध आणि मांस उत्पादन (Dual Purpose Breed of Goat) या दोन्हीसाठी पाळल्या जातात.

शरीररचना

मलबारी शेळ्या पांढर्‍या रंगाच्या असतात. यात काही काळ्या शेळ्या सुद्धा आहेत परंतु त्या अत्यंत दुर्मिळ आहेत. या शेळ्यांचे वजन कमी असते, त्यांचे कान व पाय लहान असतात आणि अंडकोष मोठे असतात. मलबारी ही मध्यम ते लहान आकाराची शेळी असून सरासरी उंची आणि शरीराची लांबी अनुक्रमे 68 आणि 70 सेमी असते. मादी शेळीचे वजन (Goat Weight) 30 किलोच्या दरम्यान असते तर नराचे (Male Goat) वजन 41 किलो असते.  

प्रजो‍त्पादन आणि उत्पादन

मलबारी शेळी 8 व्या महिन्यांत प्रजननक्षम (Goat Puberty Age) होऊन माजावर येते आणि 12 व्या महिन्यांत पहिले वेत देते. एक निरोगी मलबारी शेळी दर 6 महिन्यांनी 2-3  करडांना जन्म देते. मलबारी शेळीच्या करड्यांचे वजन 7 महिन्यांत 20-22 किलोपर्यंत पोहोचते. शेळ्यांमध्ये जुळे पिल्लू देण्याचे प्रमाण 50%, तीळे पिल्लू देण्याचे प्रमाण 25%, आणि चार पिल्लू देण्याचे प्रमाण 5% आहे.

शेळीची प्रतिदिन दूध देण्याची क्षमता (Milk Production) ही साधारणपणे 0.5 ते 1.5 लीटर आहे. दूध देण्याचा कालावधी 178 दिवसांचा असून प्रति वेत 90 लिटर दूध देते.

इतर वैशिष्ट्ये

मलबारी शेळ्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती जास्त असते आणि ती केरळ राज्यातील उष्ण आणि दमट परिस्थितीशी जुळवून घेते. या शेळ्यांचा वाढीचा दर, दुग्धोत्पादन,आणि पुनरुत्पादन  (किडिंग) क्षमता जास्त आहे. शेळीची मलबारी जात कमी चरबीयुक्त मांसासाठी प्रसिद्ध आहे. या शेळीची (Malabari Goat Breed) त्वचा टॅनिंग/लेदर (Goat Leather) उद्योगात लोकप्रिय आहे.

error: Content is protected !!