Sigatoka Disease in Banana: केळीवरील करपा रोगाचे वेळीच करा व्‍यवस्थापन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही वर्षात केळीवर करपा रोग (Sigatoka Disease in Banana) मोठ्या प्रमाणावर येत आहे. या रोगामुळे केळीच्या उत्पादनामध्ये मोठी घट येते, केळीची प्रत कमी होते, तसेच उत्पादन व आर्थिक बाबींवर प्रतिकूल परिणाम होत आहे. हा रोग बुरशीजन्य असून जगातील उष्ण कटिबंधातील केळी पिकवणाऱ्या सर्व देशात येतो.

रोगाची लक्षणे (Symptoms of the Sigatoka Disease in Banana)

  • पानांवर ३ ते ४ मि. मी. लांब व १ मि. मी रूंद आकाराचे लहान पिवळे ठिपके येतात. कालांतराने हे ठिपके तपकिरी, काळे होऊन वाढतात व लांबट गोलाकार होतात. 
  • ठिपक्यांची संख्या जास्त असेल तर ती वेगवेगळी ओळखता येत नाहीत आणि अशी रोगग्रस्त पान फाटतात, करपतात व झाडावर देठापासून मोडून लोंबकाळतात.
  • करपा रोगाचा (Sigatoka Disease in Banana) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर, तीव्र असेल तर केळी भरत नाहीत. अपरिपक्व पिकतात आणि घडातून गळू लागतात. अपरिपक्व पिकलेल्या फळाचा गर पिवळसर होतो व त्याची चव तुरट बनते.

रोगाचा प्रसार (Spread of Sigatoka Disease in Banana)

  • केळीवरील करपा रोगाचा (Sigatoka Disease in Banana) प्राथमिक प्रसार हवेद्वारे लैंगिक बीजाणूंमुळे होतो.
  • अलैंगिक बीजाणू पावसाचे थेंब व जोराचा वारा यामुळे पसरतात व दुय्यम प्रसारास कारणीभूत होतात.
  • हया बुरशीच्या वाढीस उष्ण व आर्द्रता युक्त हवामान अतिशय अनुकूल आहे. त्यामुळे हया रोगाचा प्रादुर्भाव/उद्रेक पावसाळ्यातच जास्त होतो. थंडी वाढल्यावर हया रोगाची लागण व वाढ थांबते.

रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन (Integrated Management Of Sigatoka Disease in Banana)

हा रोग एकात्मिक रोग नियंत्रण तंत्राच्या अवलंबनाने नियंत्रित होऊ शकतो.  मशागतीय पद्धती,  पिकांची फेरपालट, रोगग्रस्त पानांचा नाश व योग्य बुरशीनाशकाचा वापर केल्याने रोगाचे व्यवस्थापन करता येऊ शकते.

  • मशागतीय पद्धत (Cultivation Method)
  • केळीची लागवढ ओढे, नदी नाले यांच्या काठावरील शेतात आणि चिबड जमिनीत करू नये.
  • लागवडीसाठी योग्य आकाराचे व वजनाचे कंद घ्यावे, लागवडीपूर्वी कंद कार्बेन्डॅझिमच्या ०.१ टक्के द्रावणात अर्धा तास बुडवावेत.
  • नत्रयुक्त खताच्या मात्रा अधिक प्रमाणात व सहा महिन्यांनंतर देऊ नयेत.
  • लागवडीनंतर मुनवे वेळोवेळी काढून बाग तण रहित ठेवावी.
  • पिकांची फेरपालट करावी आणि शक्यतोवर खोडवा घेणे टाळावे.
  • जास्तीचे पाणी निचरून जाण्यासाठी बागेत च-या कराव्यात.

रोगग्रस्त पानांचा नाश (Destruction of Diseased Leaves)

रोगाची प्राथमिक लक्षणे म्हणजेच बारीक तपकिरी ठिपके, पानांवर दिसू लागताच पाने काढून नष्ट करावीत.

लागवडीचा कालावधी (Cultivation period)

केळी लागवडीचा कालावधी साधारणतः: जून व ऑक्टोबर असा आहे. जून लागवडीतील केळी दोन वेळा पावसात सापडतात त्यामुळे या बागांवर करपा रोग (Sigatoka Disease in Banana) प्राथमिक जास्त प्रमाणात दिसून येतो. जर केळी बागेची लागवड मे महिन्यात केली तर केळी मार्च – एप्रिल मध्ये काढण्यास येतात व केळी फक्त बाल्यावस्थेत पावसात सापडून रोगास बळी पडतात त्यामुळे रोग नियंत्रणाचा खर्च ब-याच प्रमाणात कमी होऊ शकतो.

ड. बुरशीनाशकाचा वापर (Fungicide use)

रोगाची लागण बाल्यावस्थेत होत असल्यामुळे केळी लागवड केल्यावर पहिल्या पावसाळ्यात त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. जेणेकरुन रोगाचा प्रादुर्भावच केळी काढण्याचे वेळी होणार नाही. पीक एक ते सव्वा महिन्याचे झाल्यावर किंवा करपा रोगाचा (Sigatoka Disease in Banana) प्राथमिक प्रादुर्भाव दिसू लागताच बुरशीनाशकाच्या फवारण्या सुरू कराव्यात.

पुढील प्रमाणे बुरशीनाशकाच्या फवारण्या कराव्यात (Fungicide For Sigatoka Disease in Banana)

लागवडीनंतर ३५- ४० दिवसांनी बोर्डोमिश्रण (१%) १ किलो मोरचूद + १ किलो चुना किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड (०.२%) ३०० ग्रॅम १०० लिटर पाणी/हेक्टर

लागवडीनंतर ५५-६० दिवसांनी कॉपर ऑक्सीक्लोराईड (०.२%) ३०० ग्रॅम १५० लिटर पाणी/हेक्टर

लागवडीनंतर ७०-७५ दिवसांनी कॉपर ऑक्सीक्लोराईड (०.२%) ४०० ग्रॅम किंवा कार्बेन्डॅझिम (०.१%) २०० ग्रॅम २०० लिटर पाणी/हेक्टर

लागवडीनंतर ८५-९० दिवसांनी कार्बेन्डॅझिम (०.१%) २५० ग्रॅम किंवा मँकोझेब (०.२%) ५०० ग्रॅम २५० लिटर पाणी/हेक्टर

लागवडीनंतर १००-१०५ दिवसांनी कार्बेन्डॅझिम (०.१%) ४०० ग्रॅम किंवा मँकोझेब (०.२%) ८०० ग्रॅम ४०० लिटर पाणी/हेक्टर

लागवडीनंतर १२०-१२५ दिवसांनी कॉपर-ऑक्सीक्लोराईड (०.२%) किंवा मँकोझेब (०.२%) १००० ग्रॅम ५०० लिटर पाणी/हेक्टर

महत्वाच्या सूचना:

१. सदरील पाणी व औषधाचे प्रमाण हे साध्या फवारणीच्या पंपासाठी आहे.  पॉवर स्पेअरचा उपयोग केल्यास औषधाचे प्रमाण तिप्पट करावे.

२. प्रत्येक फवारणीच्या वेळेस औषध पानावर चिकटून राहण्यासाठी सँडोव्हीट (प्रति दहा लिटर पाण्यात १० मि.ली.) किंवा गूळाचे पाणी किंवा डिंकाचे पाणी द्रावणात मिसळावे.  

३. पुढील वर्षी पुन्हा पावसाळ्यात सदरील रोगाचा प्रादुर्भाव (Sigatoka Disease in Banana) दिसून आल्यास वरील बुरशीनाशकाच्या फवारण्या कराव्यात.

error: Content is protected !!