Mango Black Spot: पावसामुळे डागाळलेल्या आंब्याचे असे करा व्यवस्थापन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आंबा फळांवर सध्या मोठ्या प्रमाणात काळे डाग (Mango Black Spot) येण्याची शक्यता आहे.

सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) थैमान घातले आहे, त्यामुळे आर्द्रतेमध्ये वाढ झाली आहे. फळांचा राजा आंब्याचा मोसम सुरू असताना या पावसामुळे आंब्याच्या फळांवर डाग पडत आहेत. करपा रोगामुळे (Anthracnose Disease) आंब्याच्या फळांवर काळे डाग पडत आहेत. तसेच देठकूज या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता देखील आहे.

अशा परिस्थितीत आंबा (Mango) टिकण्यासाठी बुरशीनाशकाची फवारणी (Fungicide Spraying) करणे उपयुक्त होईल, असा सल्ला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (Dr. BSKKV, Dapoli) येथील तज्ज्ञांनी सांगितले आहे. यासाठी काही विशेष उपाय सुचविले आहे. जाणून घेऊ याबद्दल.

अशी घ्या काळजी (Treatment For Mango Black Spot)

  • शेतकर्‍यांनी अझॉक्सीस्ट्रॉबिन या बुरशीनाशकाची 23.5 ई.सी. 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात स्टिकर मिसळून फवारणी करावी.
  • आर्द्रतेमध्ये वाढ झाल्यामुळे 2 फळमाशीचा (Fruit Fly) प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यासाठी हेक्टरी 4 नग रक्षक सापळे (Rakshak Trap) वेगवेगळ्या ठिकाणी झाडांच्या खालील बाजूंच्या फांद्यावर लावावेत.
  • फळगळ झालेली आंबा फळे गोळा करून नष्ट करावीत आणि बागेत स्वच्छता ठेवावी.
  • तयार झालेली आंबा फळे काढताना सकाळी 10 वाजेपर्यंत व सायंकाळी 4 नंतर नूतन झेल्याच्या सहाय्याने काढणी करावी.
  • काढणी पश्चात बुरशीजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी काढलेली फळे लगेचच 50 अंश सेल्सिअस पाण्यात 10 मिनिटे बुडवून काढावीत व नंतर सावलीत वाळवावीत. तसेच फळांची वाहतूक करताना रात्रीच्या वेळीस करावी.
error: Content is protected !!