Mango Export : रत्नागिरीचा हापूस निघाला लेबनानला; एक टन आंब्याची थेट निर्यात!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हापूस आंबा (Mango Export) म्हटले की सर्वप्रथम कोकणची आठवण होते. या कोकणच्या हापूस आंब्याला देश-विदेशात मोठी मागणी असते. गेल्या काही दिवसांमध्ये रत्नागिरीतून थेट हापूसची निर्यात केली जात आहे. यंदा कोकणातील हापूसची चव प्रथमच लेबनानवासीयांनी चाखली आहे. रत्नागिरीतील एका शेतकऱ्याने आपला एक टन आंबा नुकताच लेबनानला निर्यात केला आहे. या शेतकऱ्याने आतापर्यंत कॅनडा, इंग्लंड, अमेरिका, चीनसह जपानला सहा टन आंबा थेट निर्यात (Mango Export) केला आहे.

यंदा चांगले उत्पादन (Mango Export From India To Lebanon)

सलिल दामले असे शेतकऱ्याचे नाव असून, ते यंदा त्यांनी हापूसचे चांगले उत्पादन घेतले आहे. त्यामुळे वाशीसारख्या बाजारात दलालांकडील दर कमी झाले आहेत. परंतु, अनेक आंबा बागायतदार (Mango Export) थेट ग्राहकाकडे विक्री करण्यावर भर देत आहेत. स्थानिक मार्केटबरोबरच निर्यातीवरही काही बागायतदारांचा कल असतो. त्याप्रमाणे रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथील दामले परिचित आहेत.

एप्रिलच्या सुरुवातीलाच निर्यात सुरु

ते गेले काही वर्षे विविध देशांमध्ये आंबा पाठवत आहेत. यंदा एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यातच निर्यातीला सुरुवात केली आहे. आतापर्यंत लेबनानमध्ये थेट हापूस पाठविला नव्हता. दामले यांच्यामार्फत एक टन आंबा नुकताच निर्यात केला गेला आहे. तिथे उष्णजल प्रक्रिया करून आंबे पाठविले जातात. चेन्नई येथील प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करून, हापूस विमानाने लेबनानला गेला. यापुढे जपानला एक टन आंबा रवाना होणार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

कृषी विभागाचा परवाना

निर्यातीसाठी गॅप सर्टिफिकेट अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर कृषी विभागाचा अ‍ॅनलायटिक रिपोर्ट महत्त्वाचा असतो. हा अहवाल निर्यातीसाठी गरजेचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तीन आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून याचा परवाना घेतला आहे. त्यापैकीच सलिल दामले हे एक आहे. या परवान्यासाठी बागांमध्ये वापरण्यात येणारी औषधे, खते यांची सविस्तर माहिती द्यावी लागते. बागांचे व्यवस्थापन कसे केले जाते? याची नोंदही ठेवली जाते. त्यानंतरच कृषी विभागाकडून रिपोर्ट देण्यात येतो.

error: Content is protected !!