Mango Farming : अबब! जगातील सर्वात महागड्या आंब्याबद्दल माहिती आहे का? 10,000 रुपये किलो मिळतो दर, यंदा पावसाळ्यात करा लागवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mango Farming : आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये आंबा जास्त प्रमाणात खाल्ला जातो. मात्र असे असले तरी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आंब्याचे नाव काढले तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते जरी उन्हाळ्यात आंबा खाल्ला जात असला तरी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात देखील लोकांना आंबा खायला आवडतो. बरेच लोक उन्हाळ्याचा विचार न करता इतर ऋतूंमध्ये देखील आंबा खात असतात. त्यामुळे व्यापाऱ्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो.

सध्या आंब्याबद्दल एक आगळीवेगळी माहिती समोर आली आहे. जी वाचुन तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने एक अनोखी शक्कल लढवली आहे. या शेतकऱ्याने जगातला सर्वात महागडा आंबा बाजारात आणला आहे. त्यामुळे आता याची सगळीकडे चर्चा होेत आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या आंब्याच्या बागेत शेतकऱ्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत त्याचबरोबर पहारेदारी करण्यासाठी एक कुत्राही ठेवलाय. नेमक या आंब्यात काय खास आहे ते जाणून घेऊयात (Mango Farming)

या आंब्याबाबत जाणून घेण्याआधी शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या फळांची किंवा इतर शेतमालाची विक्री किंवा त्यांचे बाजार भाव जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही लगेचच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करा. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला शेतीसंबंधीबरीच माहिती मिळेल या ठिकाणी तुम्ही रोजचे बाजार भाव चेक करू शकता त्याचबरोबर काही सरकारी योजनांची माहिती देखील घेऊ शकता. रोजचा हवामान अंदाज पाहू शकता अशा अनेक गोष्टींची माहिती तुम्ही या ॲप मध्ये मिळेल. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जा आणि आपले hello Krushi हे ॲप डाऊनलोड करा.

हा आंबा इतर आंब्यांपेक्षा वेगळा आहे म्हणून याची किंमत देखील जास्त आहे. हा आंबा लाल पेरू सारखा लालसर आहे. या आंब्याला ‘मियाझाकी’ म्हटलं जातं. तो दिसायलाही जरा वेगळाच दिसतो, साधारणत: डायनॉसॉरच्या अंड्यासारखा आहे. राजस्थानच्या ढकनिया गावचे रहिवासी शेतकरी सुरेंद्र सिंह यांची ही यशोगाथा आहे .

माहितीनुसार, भारतात मियाझाकी आंब्याची किंमत किलोमागे 10 हजार रुपये आहे. तर, आंतराराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याला दोन लाख रुपये प्रतिकिलोने मागणी असते. त्यामुळे या आंब्याची चर्चा होताना दिसतं आहे. परदेशात त्याला ‘एग्स ऑफ सनशाइन’ आणि ‘ताइयो-नो-टोमागो’ या नावांनी ओळखलं जातं. या आंब्याच उत्पादन एप्रिल ते ऑगस्टदरम्यान घेता येतं. याबाबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आंब्याला परिपक्व होण्यासाठी कडक ऊन आणि मुसळधार पावसाची गरज असते.

error: Content is protected !!