Mango Farming : ‘ही’ आहे पाच प्रमुख आंबा उत्पादक राज्य; वाचा… महाराष्ट्राचा क्रमांक कितवा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे आंबा उत्पादक (Mango Farming) राज्य आहे. प्रामुख्याने कोकण पट्ट्यात पिकणारा हापूस आणि केसर आंबा आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे जगभर प्रसिद्ध आहे. कोकणातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादन घेतात. विशेष म्हणजे ‘कोकणचा राजा’ या नावाने प्रसिद्ध असलेला हापूस आंबा लवकर बाजारात येत असल्याने, त्याला हंगामाच्या सुरुवातीला अधिक दर मिळतो. ज्यामुळे आंबा उत्पादकांना मोठा फायदा होतो. मात्र, आता आंबा पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात नेहमी प्रश्न निर्माण होत असेल की देशातील प्रमुख आंबा उत्पादक (Mango Farming) राज्य कोणती? त्यात महाराष्ट्रात क्रमांक नेमका कितवा असेल? आज आपण तुमच्या मनातील या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.

उत्तरप्रदेश प्रथम स्थानी (Mango Farming Top Five States In India)

आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. आंब्याचा वापर प्रामुख्याने फळ म्हणून, आंब्याचा रस म्हणून इतकेच नाही तर आंब्याचे लोणचे, चटणी देखील विशेष प्रसिद्ध आहे. याशिवाय आंब्याचे आरोग्याच्या दृष्टीने देखील मोठे फायदे आहेत. देशात आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यामध्ये देशातील एकूण आंबा उत्पादनापैकी 20.85 टक्के उत्पादनासह उत्तरप्रदेश हे राज्य देशात प्रथम स्थानी आहे. उत्तर प्रदेशातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात आंबा पिकाचे (Mango Farming) उत्पादन घेतात. त्या ठिकाणचे वातावरण आणि माती आंबा पिकासाठी अनुकूल मानली जाते.

‘ही’ आहेत प्रमुख उत्पादक राज्य?

देशातील आंबा पीक हे प्रामुख्याने व्यावसायिक स्वरूपात घेतले जाते. याच पार्श्वभूमीवर देशातील एकूण आंबा उत्पादनापैकी 20.04 टक्के उत्पादनासह आंध्र प्रदेश हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर बिहार हे राज्य देशात आंबा उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर असून, त्या ठिकाणी देशातील एकूण आंबा उत्पादनापैकी 11.19 टक्के आंबा उत्पादन घेतले जाते. याशिवाय 8.06 टक्के आंबा उत्पादन घेत कर्नाटक चौथ्या स्थानी तर 5.65 टक्के आंबा उत्पादनासह तामिळनाडू पाचव्या स्थानी आहे.

महाराष्ट्र 10 व्या स्थानी

दरम्यान, महाराष्ट्र हे राज्य आंबा उत्पादनात देशातील सर्व राज्यांमध्ये 10 व्या स्थानी आहे. अल्फोन्सो (हापूस) हा महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात तसेच भारतातील कोकण भागात उत्पादित होणाऱ्या आंब्याच्या सर्वोत्तम जातींपैकी एक आहे. हा आंब्याच्या महागड्या आणि उत्कृष्ट जातींपैकी एक आहे. हे गोडपणा आणि चवीने समृद्ध आहे. मँगो फ्रूटी देखील अल्फोन्सो आंब्यापासून बनविली जाते आणि त्याशिवाय अनेक आइस्क्रीम, मूस आणि सॉफ्ले या जातीपासून बनतात.

error: Content is protected !!