Mango Man : 84 वर्षीय आजोबांनी शोधले आंब्याचे नवे वाण; पद्मश्री पुरस्काराने आहे सन्मानित!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आंबा पीक (Mango Man) घेतले जाते. प्रामुख्याने कोकण पट्टयात आंबा लागवड अधिक प्रमाणात आढळून येते. कोकणातील हापूस आंबा विशेष प्रसिद्ध असून, त्याची जगभर ख्याती आहे. इतकेच नाही तर हापूस आंब्याला अधिकचा दर देखील मिळतो. ज्यामुळे आंबा उत्पादकांना (Mango Man) आर्थिक समृद्धी मिळण्यास मदत होते.

300 हुन अधिक प्रजातीचे आंबे (Mango Man Developed New Mango Variety)

मात्र, हाजी कलीम उल्लाह खान या एका 84 वर्षीय आजोबांच्या आंबा शेतीच्या यशाबाबत आज आपण जाऊन घेणार आहोत. ते आपल्या शेतीमध्ये नेहमीच निरनिराळे प्रयोग करत असतात. याचाच एक भाग म्हणून त्यांनी आतापर्यंत एकाच आंब्याच्या झाडावर 300 हुन अधिक प्रजातीचे विविध प्रकारचे आंबे तयार केले आहेत. त्यांच्या याच कार्यासाठी त्यांना 2008 साली तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मात्र अशातच आता केवळ सातवीपर्यंत शिक्षण झालेल्या आणि ‘मँगो मॅन’ (Mango Man) अशी ओळख असलेल्या या आजोबांनी आणखी एका आंब्याच्या नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राष्ट्रीय पटलावर ते चर्चेत आले आहे.

वैज्ञानिकही घेतात त्यांच्याकडून मार्गदर्शन

शेतकरी हाजी कलीम उल्लाह खान हे उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील रहिवासी असून, त्यांनी केवळ सातवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. मात्र, आज हाजी कलीम उल्लाह खान यांच्याकडे फळबाग क्षेत्रातील मोठमोठे वैज्ञानिक मार्गदर्शन घेण्यास येतात. अशातच 2023 या गेल्या वर्षीच्या सुरुवातीला त्यांनी एका नवीन आंब्याची लागवड केली होती. ज्याचे आता एका मोठ्या वृक्षात रूपांतर झाले आहे. मात्र हे आंब्याचे झाड इतर झाडांपेक्षा खूपच वेगळे असून, त्याची पाने खूप रुंद आणि बरीच मोठी आहेत. त्यांनी लागवड केलेले हे आंब्याचे झाड सर्वसाधारण आंब्याच्या झाडांपेक्षा वेगळे आहे.

कलम पद्धती ठरली यशस्वी

हाजी कलीम उल्लाह खान (Mango Man) या नवीन आंब्याच्या प्रजातीच्या झाडाबद्दल सांगतात, त्यांनी हे आंब्याचे झाड लावताना मागील वर्षी 2023 च्या सुरुवातीला एक कोय लावली होती. त्यानंतर रोपटे मोठे झाल्यावर त्यांनी कलम पद्धतीने त्याच्यावर दुसऱ्या झाडाची फांदी कलम केली. आपण या आधीही आंब्यावर प्रयोग करत मोठ्या प्रमाणात झाडे लावली. आता हा देखील प्रयोग यशस्वी झाला असून, आपण आतापर्यंत लाखो आंब्याची झाडे लावली आहेत. मात्र, हे नव्याने विकसित झालेले आंब्याचे झाड इतरांपासून खूपच वेगळे आहे. त्याची पाने खूप लांब रुंद असून, गडद हिरव्या रंगाची आहेत. या झाडाला फळे येण्यास अजून, 3 ते 4 वर्षांचा अवधी आहे. मात्र, पानांवरुन समजते की या झाडाला येणारे फळ हे बरेच मोठे असणार आहे.

हाजी कलीम उल्लाह खान सांगतात, आपला आजपर्यंतचा अनुभव आहे की ज्या आंब्याची झाडाची पाने जितकी मोठी असतात. तितका त्या आंब्याचा रस पातळ बनतो. जो पचनासही लवकर पचतो. आपल्या 84 वर्षाच्या कारकिर्दीत आतापर्यंत आपण अशा लांब रुंद आंब्याचे पानाचे झाड पाहिलेले नाही. त्यामुळे ही नवीन प्रजाती नक्कीच शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरेल, असे ते शेवटी सांगतात.

error: Content is protected !!