Mango Market Rate : आंब्याला 45000 रुपये क्विंटलचा भाव; पहा आजचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मुंबई येथील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याची (Mango Market Rate) आवक बऱ्यापैकी होत आहे. या वाढलेल्या आवकेसोबतच आता अल्फांसो अर्थात हापूस आंब्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मुंबई बाजार समितीत प्रामुख्याने कोकणातील जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात आंबा दाखल होतो. परिणामी, आता आंबा दरात झालेल्या वाढीचा आंबा उत्पादकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. आज मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हापूस आंब्याला कमाल 45000 रुपये प्रति क्विंटल अर्थात 450 रुपये प्रति किलो इतका उच्चांकी दर (Mango Market Rate) मिळाला आहे.

एप्रिलमध्ये दर कमी होणार? (Mango Market Rate Today 12 March 2024)

बाजार विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, “मार्च महिन्यात साधारपणे आंब्याचे भाव (Mango Market Rate) अधिक असतात. त्यामुळे पुढील एप्रिल महिन्यात आवक वाढल्यानंतर दरात बऱ्याच प्रमाणात घसरण होऊ शकते. मात्र, सध्याच्या आंब्याचे भाव पाहता, हापूस आंबा सामान्यांना खरेदी करण्यासाठी आवाक्याबाहेर असल्याचे पाहायला मिळत आहे.” दरम्यान, आज मुंबई बाजार समितीत हापूस आंब्याची 390 क्विंटल आवक झाली असून, कमाल 45000 रुपये ते किमान 7000 रुपये तर सरासरी 26000 रुपये प्रति क्विंटल दर हापूस आंब्याला (Mango Market Rate) मिळाला आहे. अर्थात हापूसला प्रति किलोसाठी कमाल 450 रुपये तर कमीत कमी 70 रुपये प्रति किलो इतका दर मिळाला आहे.

राज्यातील आंब्याचे बाजारभाव

दरम्यान, राज्यातील पुणे बाजार समितीत आज आंब्याची 1 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10000 रुपये ते किमान 10000 रुपये तर सरासरी 10000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. नाशिक बाजार समितीत आज आंब्याची 7 क्विंटल आवक झाली असून, कमाल 15000 रुपये ते किमान 8000 रुपये तर सरासरी 13000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी बाजार समितीत आंब्याची आज 1 क्विंटल आवक झाली असून, कमाल 5500 रुपये ते किमान 4500 रुपये तर सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

कोकणचा राजा म्हणून ओळख

हापूस आंबा हा प्रामुख्याने कोकणात मोठ्या प्रमाणात पिकतो. विशेष म्हणजे हापूस आंब्याला कोकणचा राजा म्हणून ओळखतात. महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध असलेल्या या हापूस आंब्याची शेती प्रामुख्याने रत्नागिरी या जिल्ह्यासह कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आढळते. कोकणातील हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन देखील मिळाले असून, येथील आंबा विदेशात देखील मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो. याशिवाय हापूस आंब्यासोबतच कोकणातील केसर या जातीचा आंबा देखील आपल्या उत्तम चवीसाठी व अप्रतिम गोडीसाठी प्रसिद्ध आहे. या केसर आंब्याला देखील भौगोलिक मानांकन मिळाले आहे.

error: Content is protected !!