Mango Processing : आंब्यापासून सुरु करू शकता ‘हा’ प्रक्रिया उद्योग; बनवा ‘हे’ विविध पदार्थ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आंबा हे फळ (Mango Processing) आपल्याला सगळ्यांना त्याच्या सुमधूर चव आणि सुगंध यासाठी परिचित आहे. तसेच त्यामध्ये असलेल्या अति गरमुळे आंब्याला फळांचा राजा असे संबोधले जाते. जर आंबा व त्यावरील प्रक्रिया उद्योगांचा विचार केला तर आंब्यापासून बनलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांना वर्षभर आपल्या देशात व अन्य देशात बाहेरील भरपूर मागणी असते. त्यामुळे आंबा फळ प्रक्रिया उद्योग हा एक निश्चितपणे यशस्वी होण्याचा एक खात्रीलायक उद्योग आहे. आज आपण आंब्यापासून तयार होणाऱ्या विविध प्रक्रियायुक्त (Mango Processing) पदार्थांविषयी माहिती घेणार आहोत.

बनवू शकता ‘हे’ प्रक्रियायुक्त पदार्थ (Mango Processing Unit)

1. आंब्यापासून स्क्वॅश बनवणे : जर आंब्यापासून स्क्वॅश बनवायचे (Mango Processing) असेल तर आंबे हे टणक आणि आंबट असायला हवे. अगोदर कच्च्या आंब्याचा वापर करताना फळे शिजवून त्यामधील गर काढावा लागतो. यामध्ये एक किलो गरात एक किलोग्राम साखर, एक लिटर पाणी, 20 ते 30 ग्रॅम सायट्रिक आम्ल आणि गरजेप्रमाणे नारंगी, पिवळा खाण्याचा रंग या घटकांचा वापर करतात.

तयार झालेल्या स्क्वॅश चा ब्रिक्स 45 अंश तर आम्लता 1.5 टक्के असावी.स्क्वॅश तयार झाल्यानंतर एक मिलीच्या चाळणीतून गाळून काढावा. तसेच यामध्ये 610 मिलिग्रॅम प्रतिलिटर सोडिअम बेन्झोएट मिसळावेहनी स्क्वॅश निर्जंतुक केलेल्या बाटल्यांत भरून थंड ठिकाणी साठवावा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जंतुविरोधी परिरक्षक वापरले नसल्यास स्क्वॅश भरलेल्या बाटल्यांचे गरम पाण्यात तीस मिनिटे पाश्चरीकरण करावे.

2. आंब्याचे काप : आंब्याचे काप तयार करण्यासाठी टणक आणि काहीशी कमी पिकलेली फळे निवडून त्या फळांवरील साल काढून त्या गराचे काप काढावेत. कापलेले काप काळे पडू नयेत म्हणून ते दोन टक्के मिठाच्या द्रावणात किंवा साध्या पाण्यात बुडवून ठेवावेत. हे काप मलमल कापडात गुंडाळून उकळत्या पाण्यात पाच ते दहा मिनिटे शिजवावे. नंतर हे शिजवलेले काप कापडावर पसरून त्यास स्टीलच्या फोर्कने भोक पाडावीत.

कपाच्या वजनाएवढे त्यामध्ये साखर घेऊन त्याचा 1:3 पाणी घालून पाक करावाआणि त्यात नंतर 1.5 ग्रॅम प्रति किलो सायट्रिक अम्ल घालून काप मिसळावेत. या मिश्रणाला चाकून 3ते चार मिनिटे 106 अंश सेंटिग्रेड तापमानाला तीन-चार तारी पाक होईपर्यंत गरम करावे. नंतर हे काप पाका सहित बरणीत भरून साठवाव्यात जर या कापांची दीर्घकाळ साठवून करायचे असेल तर प्रति किलो 600 मिलिग्रॅम सोडिअम बेन्झोएट मिसळावे.

3. आंब्याच्या फोडी पाकात टिकवणे : यासाठी पूर्ण पिकलेली, टणक फळे निवडावीत. फळे स्वच्छ करून त्यावरील साल वेगळी करून घ्यावी आणि चाकू च्या मदतीने घराचे सहा ते आठ तुकडे आंब्याच्या कोई पासून वेगळे करावेत. साधारणपणे 500 ग्रॅम गराचे तुकडे एखाद्या कॅनमध्ये भरून त्यावर 40 अंश ब्रिक्स असलेला साखरेचा गरम पाक तुकडे बुडेपर्यंत ओता व. या पाकामध्ये दोन टक्के सायट्रिक आम्ल मिसळावे. भरलेल्या केन 80 अंश सेंटिग्रेड तापमानास सात मिनिटे गरम करून सील करावे. नंतर या सील केलेल्या कॅन उकळत्या पाण्यात वीस मिनिटे ठेवून थंड कराव्यात.

error: Content is protected !!