Mango Production : आंब्याला दरवर्षी फळे का नाही येत? वाचा..नेमकं काय असते कारण?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन (Mango Production) घेतले जाते. आंबा हे व्यावसायिक शेती पीक असून, महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकण पट्टयात अधिक आंबा उत्पादन होते. तर देशात उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओरिसा आणि गुजरात ही आंबा उत्पादनातील आघाडीवरील राज्य आहेत. ताज्या आकडेवारीनुसार देशात एकूण 2,460 हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड केली जाते. ज्यातून दरवर्षी 17,290 हजार मेट्रिक टन आंब्याचे उत्पादन (Mango Production) होते. मात्र, आंब्याच्या झाडाला दरवर्षी फळे येत नाहीत. आंबा बागाईतदार शेतकऱ्यांची ही सर्वात मोठी समस्या असते. यामागे नेमके कारण असते. याबाबत आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

प्रत्येक वर्षी नाही होत फळधारणा (Mango Production Mango Not Bear Fruit Every Year)

आंबा पिकाचे उत्पादन (Mango Production) घेताना प्रामुख्याने द्वैवार्षिक फळधारणेची समस्या शेतकऱ्यांना जाणवत असते. अर्थात एक वर्ष आड वर्ष फळधारणा होते. तर काही वेळा या वर्षी आंब्याच्या झाडाला मागील वर्षी खूप फळे लगडलेली असतील. तर चालू वर्षी त्या तुलनेत खूपच कमी उत्पादन मिळते. आंब्याच्या झाडाला दरवर्षी अपेक्षित फळ न येणे ही अनुवांशिक समस्या आहे. त्यामुळे यावर फारसा प्रभावी उपाय नाही. गेल्या काही वर्षांत आंब्याच्या अनेक संकरित जाती विकसित करण्यात आल्या आहेत. जे या समस्येपासून मुक्त आहे, त्यामुळे दरवर्षी फळे मिळण्यासाठी संकरित वाणांच्या लागवडीस शेतकऱ्यांनी प्राधान्य देण्याची गरज आहे.

हंगामात 1000 ते 3000 फळे मिळतात

आंबा लागवडीनंतर पहिल्या चार ते पाच वर्षांच्या वयातच आंबा झाड फळ देण्यास सुरुवात करते. तर लागवडीनंतर आंबा झाड 12-15 वर्षांमध्ये पूर्ण परिपक्व होते. एक पूर्ण वाढ झालेले आंबा झाड एका हंगामात 1000 ते 3000 फळांचे उत्पादन (Mango Production) होते. चांगली काळजी घेतल्यास आंब्याची झाडे 60-70 वर्षांपर्यंत फळे देतात. परिणामी शेतकऱ्यांनी आंबा बागेतील नियमित तण व्यवस्थापन करण्यासह, १० वर्षाचे झाड झाल्यानंतर त्याला 500 ग्रॅम नायट्रोजन, 250 ग्रॅम फॉस्फरस आणि 500 ​​ग्रॅम पोटॅशियम 10 वर्षे किंवा 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आंब्याच्या झाडांना प्रति झाड द्यावे.

किती द्यावे शेणखत?

याशिवाय शेतकऱ्यांनी आपल्या प्रौढ झाडांना 20 ते 25 किलो चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. हा डोस 10 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या (प्रौढ झाडे) झाडांसाठी आहे. जर लहान झाडांना वरील खताची मात्रा 10 ने विभाजित करून तितक्या प्रमाणात द्यावी. अर्थात 1 वर्षाच्या झाडासाठी 2 ते 2.5 किलो शेण खत टाकावे. वरील सर्व खते शेण खताप्रमाणेच १० ने विभागून दिली जाऊ शकतात.

error: Content is protected !!