Mango Rate : आवक वाढताच आंब्याच्या दरात घसरण; डझनाला 800 रुपये दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक भागांमध्ये सध्या आंब्याचा (Mango Rate) हंगाम सुरु झाला असून, बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या काळात आंब्याला वरचढ दर मिळत होता. मात्र, सध्या घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही बाजारांमध्ये दरात घसरण सुरु झाली आहे. राज्यातील बाजारपेठांमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक सुरु झाली आहे. ज्यामुळे सध्या आंबा दरांवर (Mango Rate) परिणाम दिसून येत आहे.

किती मिळतोय डझनाला दर (Mango Rate Fall As Arrivals Rise)

हापुस उत्पादक आणि विक्री सहकारी असोशिएशनच्या माहितीनुसार, उपलब्ध बाजारभाव आकडेवारीनुसार, किरकोळ बाजारात सध्या एक डझन आंब्याला 800 ते 1,000 रुपये दर (Mango Rate) मिळत आहे. यावर्षी कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला होता. अशातही यंदा राज्यातील आंबा बागायतदारांनी मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादन घेतले असून, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमधून सध्या मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.

दरात आणखी घट होण्याची शक्यता

याउलट कर्नाटकातून महाराष्ट्रातील पुणे बाजार समितीत दाखल होणाऱ्या आंब्याला सध्या 200 ते 300 रुपये प्रति डझनचा दर मिळत आहे. लालबाग आंब्याला 40-50 रुपये प्रति किलो दर मिळत आहे. तर पयारी 200-300 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. सध्याचा आंब्याचा दर दरवर्षी मार्च अखेरला मिळणाऱ्या आंब्याच्या दरापेक्षा कमी आहे. अशातच आता येत्या काही दिवसांमध्ये आंब्याच्या किमतींमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

कर्नाटकातून होतीये आवक

हापुस उत्पादक आणि विक्री सहकारी असोशिएशनच्या माहितीनुसार, चालू वर्षीच्या हंगामात सध्या बाजारात आंब्याची आवक अचानकपणे वाढली आहे. बाजारात आंब्याची आवक वाढण्यामागे, कर्नाटकात यंदा आंबा पिकास अनुकूल हवामान राहिले. कर्नाटकात यावर्षी आंबा उत्पादकांना अवकाळी पावसाचा फटका बसला नाही. ज्यामुळे सध्या महाराष्ट्रात कर्नाटकातून अधिक आंबा दाखल होत आहे. परिणामी, राज्यातील बाजारात आवक वाढून, दरात काहीशी घसरण पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!