Mango Rate : कर्नाटकचा आंबा पुण्याच्या बाजारात; आंब्याच्या दरात मोठी घट!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आंब्याची आवक (Mango Rate) मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे पुण्यातील बाजार समितीमध्ये आंब्याच्या किंमती जवळपास 200 ते 300 रुपये प्रति डझनपर्यंत घसरल्या आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील रत्नागिरी हापूस, तसेच रायगड आणि सिंधुदुर्गचा हापूस बाजारात मोठ्या प्रमाणात येत आहे. असे असतानाच शेजारील कर्नाटक राज्यातील ‘लालबाग’ आणि ‘पयारी’ प्रजातीचा आंबा देखील पुणे बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहे. परिणामी, कर्नाटकचा आंबा कमी दरात (Mango Rate) उपलब्ध असल्याने, राज्यातील हापूस आंब्याला त्याचा फटका बसत आहे.

हंगामाच्या मध्यानंतर आवक घटणार? (Mango Rate Karnataka Mango In Pune Market)

साधारणपणे मार्च महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंत बाजारात आंब्याची आवक (Mango Rate) मोठ्या प्रमाणात होते. यावर्षी वेळेआधीच आंब्याची आवक बाजारात मोठ्या प्रमाणात होत आहे. आवक लवकर सुरु होणे, ही यावर्षीच्या आंब्याच्या संपूर्ण हंगामासाठी धोक्याची घंटा मानली जाते. अर्थात वेळेआधीच आंब्याची आवक बाजारात वाढल्यानंतर, आंब्याचा हंगाम लवकर संपतो. ज्यामुळे यंदा देखील आंब्याचा हंगाम लवकर संपण्याची शक्यता अधिक आहे. आंबा बाजारातील व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “सध्याच्या घडीला बाजारात कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून आणि कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होत आहे. जी आश्चर्यजनक असून, हंगामाच्या मध्यानंतर, याउलट परिणाम होऊन आवक मोठ्या प्रमाणात घटू शकते.”

आंब्याच्या दरात 50 टक्के घट

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी आंबा उत्पादनासाठी पोषक वातावरण मिळाल्याने, तुलनेने अधिक उत्पादन झाले आहे. परिणामी, सध्या आंब्याला 900-1500 रुपये प्रति डझन इतका दर (Mango Rate) मिळत आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 2000 ते 2500 रुपये प्रति डझन इतका मिळत होता. अर्थात यावर्षी आंब्याच्या दरात ५० टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. त्यातच येत्या काळात आंब्याच्या दरात आणखी घट होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत बाजारात तुलनेने अधिक आंबा उपलब्ध असल्याने, दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!