Mango Spongy Tissue: तुमच्या आंब्यावर साका पडतो का? असे करा व्यवस्थापन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: हापूस आंब्यावर (Mango Spongy Tissue) वेगवेगळ्या किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव तर आढळतोच याशिवाय काही आंब्यावर विकृती (Mango Malformation) सुद्धा आढळतात. यात फळावर पडणारा साका हा उत्पादन आणि आंब्याची प्रत (Mango Quality) यावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम करतात. जाणून घेऊ साका (Mango Spongy Tissue) होण्याची कारणे आणि त्यावर करता येणारे उपाय.   

साका म्हणजे काय? (Mango Spongy Tissue)

साका म्हणजे आंब्यामध्ये कापसासारखा पांढरा भाग तयार होणे किंवा तो भाग आंब्याच्या गरापेक्षा रंगाने वेगळा असतो. तो अतिशय आंबट असतो. वाढत्या तापमानामुळे हापुसमध्ये (Alphonso Mango) साका मोठ्या प्रमाणात आढळतो. ज्या आंब्यांचे देठ खोल गेलेले आहेत, ज्यांचे खांदे अति उंचावलेले आहेत आणि आंब्याला बर्‍यापैकी गोलाई आलेली आहे, आंबा गोलाकार फुगल्यासारखा वाटतो त्यात साका होतो.

साका का होतो? (Causes Of Mango Spongy Tissue)

जागतिक तापमानात होणारी वाढ ही साका निर्मितीच्या प्रक्रियेला कारणीभूत ठरत आहे. त्यासोबतच खालील कारणांमुळे आंबा फळात साका पडतो.

  • फळांची काढणी उन्हात केल्यामुळे आणि फळं काढणीनंतर उन्हात ठेवल्यामुळे
  • फळे बाजारपेठेत पाठवतानाही कडक उन्हातून फळांची ने-आण केल्यामुळे  
  • झाडामध्ये कॅल्शियमची कमतरता असल्यास आंब्यांमध्ये साका (Mango Spongy Tissue) होण्याची शक्यता जास्त असते.
  • हापूस बॉक्समधून लांबच्या बाजारपेठेत पाठवताना उष्णता साठून राहिल्यामुळे, पुरेशी हवा खेळती न राहिल्यामुळे, चुकीच्या वाहतुकीच्या पद्धतीमुळे, सदोष हाताळणीमुळेही साक्याचा धोका असतो.
  • तसेच हापुसची कलमे करण्यासाठी हापुसचा बाटा वापरल्यास साक्याची शक्यता वाढते.

असे करा साकाचे व्यवस्थापन (Management of Mango Spongy Tissue)

  • बागेतील उष्णता कमी करण्यासाठी कलमांना दर आठवड्याला 150 ते 200 लिटर पाणी द्यावे, कलमांच्या बुंध्यात आच्छादन (Mango Mulching) करावे.
  • वाढत्या तापमानाच्या काळात सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत झाडावर पाण्याचा फवारा मारावा. उशिरा पाण्याची फवारणी करू नये. कारण झाडावर किंवा फळावर ओलसरपणा राहण्याची शक्‍यता असते.
  • फळांची काढणी (Mango Harvesting) 14 आणे (85 ) तयार झाली असताना काढावीत, फळांचे देठ खोल जाईपर्यंत व फळाला पूर्ण गोलाई येईपर्यंत वाट पाहू नये,
  • उन्हातून फळं काढणी न करता सकाळी उजाडलेले असताना सहा ते सात वाजल्यापासून सकाळी साडे दहा ते अकरा आणि संध्याकाळी चार ते साधारण प्रकाश असेपर्यंत म्हणजेच सात वाजेपर्यंत करावी.
  • फळांची काढणी झाल्यानंतर फळे सावलीत ठेवावीत तसेच सावलीच्या ठिकाणी साठवावीत.
  • आंबे बाजारपेठेत नेण्यासाठी विशेषत: लांबच्या बाजारपेठेत नेताना संध्याकाळी 5 ते सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत पर्यंत फळांची वाहतूक (Mango Fruit Transport) करावी.

साका (Mango Spongy Tissue) शोधक यंत्राची निर्मिती करण्यात आलेली आहे, परंतु सध्यातरी हे यंत्र महाग आहे, यामुळे सामूहिक पातळीवर या यंत्राचा वापर करता आला तर पहावे.

error: Content is protected !!