Mango Variety : ‘या’ आहे भारतातील आंब्याच्या 15 प्रमुख जाती; ज्यांना असते सर्वाधिक मागणी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या आंब्याचा सिझन (Mango Variety) सुरु असून, एप्रिल महिन्याच्या मध्यावधीपर्यंत आंब्याचे दर बरेच आटोक्यात आले आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने हापसू आणि केसर आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र, आपल्या देशात आंब्याच्या 1500 जाती आढळतात. विशेष म्हणजे प्रत्येक आंब्याच्या जातीची विशेष ओळख असून, ते आपल्या चव, आकार आणि रंगांसाठी ओळखले जातात. यात कोकणचा हापूस व केसर, दक्षिणेकडील तोतापुरी प्रजातीचा आंबा (Mango Variety) भारतीय बाजारपेठांमध्ये राज्य करतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण आंब्यांच्या एकूण 15 प्रसिद्ध जातींबद्दल जाणून घेऊया.

‘या’ आहेत 15 प्रसिद्ध प्रजाती (Top 15 Mango Variety In India)

1. हापूस आंबा : हापूस आंबा हा देशातील टॉपचा आंबा आहे. निर्यातीसाठी तो विशेष प्रसिद्ध आहे. त्याची चव, रंग, सुगंध यामुळे त्याला मोठी मागणी असते. बाजारात मुख्यत: रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस या कोकणी आंब्याला मोठी मागणी असते. याशिवाय या आंब्यांची लागवड ही कर्नाटक राज्यातही होते. मात्र, या आंब्यांना कर्नाटकी हापूस म्हणतात.

2. केसर आंबा : केसरप्रमाणे भगव्या रंगामुळे याचे नाव केसर आंबा (Mango Variety) असे पडले आहे. केसर आंबा हा हापूसनंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लोकप्रिय आंबा आहे. या आंब्याचा आकार अंडाकृती आणि मध्यम असतो. अहमदाबादपासून 320 किमी अंतरावर असलेल्या गुजरातमधील जुनागढच्या गिरनार टेकड्यांमध्ये या आंब्याची लागवड केली जाते. तसेच महाराष्ट्रातही याचे उत्पादन बऱ्याच प्रमाणात होते.

3. तोतापुरी आंबा : कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातील, हा आंबा चवीला सौम्य आणि हिरवट रंगाचा असतो. हा आंबा पोपटाच्या चोचीसारखा दिसतो. सलाड आणि लोणच्यासाठीही उत्तम आहे. हा आंबा व्यावसायिक प्रक्रिया उद्योगासाठी विशेष लोकप्रिय आहे.

4. लंगडा आंबा : पाय नसलेल्या माणसाच्या शेतात पहिल्यांदा या प्रजातीच्या आंब्याची लागवड केली गेली होती. म्हणून या आंब्याच्या जातीला लंगडा आंबा म्हणतात. हा आंबा जुलै ते ऑगस्टपर्यंत बाजारात उपलब्ध होतात. लंगडा हा आंब्याची एक प्रसिद्ध जात आहे. ही जात उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे प्रथम लागवड केली गेली होती.

5. दशेरी आंबा : हा आंबा महाराष्ट्रात ‘दशेरी’ या नावाने प्रसिद्ध आहे. मात्र उत्तर भारतात हा आंबा दशहरी या नावाने ओळखला जातो. ही उत्तर भारतातील अतिशय प्रसिद्ध अशी आंब्याची प्रजाती आहे. हा आंबा लांबट आकाराचा असतो. साधारणपणे एक वर्षाआड याला फळे येतात. या आंब्याची चव इतर जातीच्या आब्यापेक्षा खूपच जास्त गोड असते.

6. सिंधूरा आंबा : हा आंबा दिसायला वेगळा असून त्याची साल बाहेरून लाल आणि पिवळी असते. या आंब्याची चव आंबट-गोड असून याची चव खाल्ल्यानंतर तोंडात बराच काळ रेंगाळते. शेक तयार करण्यासाठी हा आंबा खूप चांगला आहे.

7. चौसा आंबा : उत्तर भारत आणि बिहारमध्ये ही लोकप्रिय जात शेरशाह सूरीने सोळाव्या शतकात त्याच्या कारकिर्दीत आणली होती. ह्या जातीला बिहारमधील एका शहराचे नाव दिले गेले आहे. हा आंबा पिवळ्या-सोनेरी रंगाचा असतो. त्याच्या पिवळ्या-सोनेरी रंगाने सहज ओळखता येतो.

8. बंगीनापल्ली आंबा : या आंब्याची साल त्याची साल पिवळसर रंगाची असून, त्यावर काही डाग असतात. या आंब्याचे फळ अंडाकृती आकाराचे असते. या आंब्याच्या जातीचे उत्पादन आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील बानागनपल्ले येथे केले जाते.

9. पायरी आंबा : पायरी या आंब्याच्या सालीला तांबूस रंगाची छटा आणि चवीला आंबट असे हे फळ गुजरातमध्ये आमरस बनवण्यासाठी जास्त वापरतात.

10. रासपुरी आंबा : हा आंबा मे महिन्यात तोडणीला येतो. साधारणपणे जूनच्या अखेरीस बाजारात उपलब्ध होतो. दही, स्मूदी आणि जाममध्ये याचा वापर केला जातो. कर्नाटकातील जुने म्हैसूर येथे मोठ्या प्रमाणावर पिकवली जाणारी ही जात भारतात आंब्याची राणी म्हणून ओळखली जाते.

11. मालदा आंबा : आंब्यांच्या तुलनेत याचे आवरण पातळ असते आणि त्याला गोड सुगंध असतो. बिहारमधील ‘आंब्याचा राजा’ म्हणून ओळखले जाणारा मालदा आंबा चवीला गोड-आंबट असून तो रसाळ आणि स्वादिष्ट आहे.

12. बदामी आंबा : या जातीच्या सालीला चमकदार सोनेरी पिवळा लाल रंगाची छटा असते. जी फळाच्या वरच्या बाजूला पसरते. बदामी ही कर्नाटकातील आघाडीची आंब्याची जात असून एप्रिल ते जुलै या कालावधीत हा आंबा बाजारात येतो.

13. नीलम आंबा : नीलम ही जात देशाच्या प्रत्येक भागात पिकवली जाते. सामान्यतः जूनमध्ये भरपूर प्रमाणात आढळते. त्याची साल केशरी असते आणि आंब्याच्या इतर जातींच्या तुलनेत आकाराने लहान असते.

14. मालगोवा आंबा : या आंब्याचे वजन 300-500 ग्रॅम आणि तो तिरकस गोलाकार आकाराचा असतो. ज्यावर पिवळ्या छटासह हिरवा रंग असतो. हे आंबे बहुतेक मे आणि जूनमध्ये उपलब्ध होतात.

15 . हिमसागर आंबा : हा आंबा मध्यम आकाराचा, पिवळ्या सालीसह हिरव्या रंगाचा असतो. गोड सुगंध आणि पश्चिम बंगाल, ओरिसाची खासियत असलेले हे फळ मध्यम आकाराचे असून, त्याचे वजन 250-350 ग्रॅम दरम्यान असते.

error: Content is protected !!