हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यंदा अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडलं असून डोक्यावरील कर्जाने कंटाळून मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यास सुरुवात केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागील वर्षी १ हजार २२ शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केली. तर यावर्षी चार महिन्यात म्हणजे जानेवारी ते एप्रिल या महिन्यात ३०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
निसर्गाचा लहरीपणा, सिंचनाचा अभाव, कमाल शेती शाश्वत तसेच श्रमाच्या तुलनेत शेतीचे उत्पन्न नसल्याने दिवसेंदिवस होत जाणारे हलाकीचे जगणे, कर्ज काढून ५ ते १० टक्क्यांनी सावकर कर्ज देऊन कर्ज फेडण्यासाठी शेतकरी मरणाला कवटाळत आहेत . यामुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण अधिक आहे. अशातच आता २०२० ते २२ या वर्षात २ हजार ६८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आठही जिल्ह्यात एक सर्व्हे केला असून, त्यातून काही महत्वाचे निकष काढले आहेत. ज्यात पाच लाख कुटुंबाचे १२ टप्प्यात १०० प्रश्नांद्वारे सर्व्हे तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ही आत्महात्या रोखण्यात यावी यासाठी शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी प्रती एकर १० हजार रुपये रोख रक्कम देण्याचा निकष सर्व्हेमधून काढला आहे.
अ.क्र. जिल्ह्यांचे नाव शेतकऱ्यांची
आत्महत्या
१ छत्रपती संभाजीनगर ३५
२ जालना २२
३ परभणी २६
४ हिंगोली ११
५ नांदेड ४७
६ बीड ८१
७ लातूर २३
८ धाराशिव ६०