Marigold Farming : झेंडू उत्पादकांनो, करा ‘हा’ घरगुती जुगाड; फुले कधीच सुकणार नाही!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात फुलशेतीकडे (Marigold Farming) वळत आहेत. यामध्ये प्रामुख्याने झेंडू या फुलाची शेती करणारे शेतकरी अधिक आढळतात. झेंडूच्या फुलांना सणासुदीच्या काळात आणि लग्न समारंभांमुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मोठी मागणी असते. त्यामुळे या फुलाच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र, अनेक शेतकऱ्यांची तक्रार असते की सकाळी तोडलेली फुले बाजारात नेईपर्यंत बऱ्याच प्रमाणात सुकून जातात. मात्र, आज आम्ही तुम्हाला झेंडूची फुले (Marigold Farming) अधिक काळ ताजीतवानी ठेवण्यासाठी एक प्रभावी उपाय सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही अधिक काळ तुमची फुले ताजी ठेऊन अधिकचा दर मिळवू शकतात.

कशी करावी तोडणी? (Marigold Farming Deshi Jugad For Farmers)

वातावरणीय परिस्थितीनुसार झेंडूची लागवड (Marigold Farming) पावसाळी, हिवाळी व उन्हाळी या तीनही हंगामात केली जाते. धार्मिक पूजा, सणासुदिला, दररोज मंदिरांमध्ये किंवा मग लग्न आणि अन्य समारंभामध्ये सजावटीसाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. शेतकरी साधारपणे सूर्याच्या उगवतीला पहिली किरणे पडण्याच्या आत फुलांची तोडणी करतात. किंवा मग आदल्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास तोडणी करून सकाळी लवकर बाजारात नेतात. मात्र, झेंडूच्या फुलांची तोडणी हाताने ओरबाडून न करता धारदार असलेल्या छोट्या चाकूने किंवा कात्रीने फुलापासून थोडी लांब अंतरावर तिरप्या पद्धतीने करावी. ज्यामुळे लांब देठातील पाण्याच्या प्रमाणामुळे झेंडूचे फुल अधिक काळ ताजे राहते.

साखरेच्या जुगाडामुळे फुले राहतील टवटवीत

सकाळी-सकाळी विक्रीला जाण्यास अवधी असेल तर तोडणीनंतर फुलांना डेरेदार सावलीत पसरून ठेवावे. आणि फुलांना बाजारात नेण्याची तयारी करताना एका बादलीत 2 ते 3 लिटर पाणी घेऊन, त्यात साधारपणे 40 ते 50 ग्रॅम साखर टाकून ती पूर्ण विरघळेपर्यंत ढवळावे. त्यानंतर हे साखरेचे पाणी विक्री नेताना फुलांवर शिंपडावे. याशिवाय तुम्ही जर आदल्या दिवशी झेंडूची तोडणी करून ठेवत असाल तर तिरकी कापलेली देठे शक्य असेल तर पाण्याच्या बादलीत किंवा पसरट भांड्यात बुडवून ठेवा. हे पाणी साखरेचे असावे. तुमची फुले अधिक असतील तर साधारणपणे 2 ते 3 लिटर पाण्यासाठी 40 ते 50 ग्रॅम असे प्रमाण असावे. या उपायामुळे तुमची झेंडूची फुले बाजारात जाईपर्यंत टवटवीत राहून तुम्हाला अधिकचा दर मिळण्यास मदत होईल. त्यामुळे बाजारात नियमित झेंडू विक्रीस नेणाऱ्या शेतकऱ्यांनी हा उपाय नक्की करून पाहा.

error: Content is protected !!