Mashroom Farming : कमी खर्चात मशरूम शेती; शेतकरी करतोय वर्षाला 5 ते 6 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांचा कल मशरूम शेतीकडे (Mashroom Farming) वाढला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना मशरूम लागवडीतून अधिक उत्पन्न देखील मिळत आहे. मशरूम शेतीसाठी योग्य प्रशिक्षण आणि माहिती असल्यास शेतकरी त्यातून मोठ्या प्रमाणात कमाई करू शकतात. आज आपण अशाच एका मशरूम उत्पादक शेतकऱ्याच्या यशस्वी मशरूम शेतीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी लाकडी साधनांचा वापर करून, मशरूम शेतीसाठी प्राथमिकता तयार केली आहे. ते आपल्या मशरूम शेतीतून (Mashroom Farming) वार्षिक 5 ते 6 लाखांचा निव्वळ नफा मिळवत आहे.

कमी खर्चात सुरुवात (Mashroom Farming Farmer Earning 5 To 6 Lakhs)

सतीश कुमार असे या शेतकऱ्याचे नाव असून ते उत्तरप्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील रहिवासी आहे. विशेष म्हणजे योग्य मार्गदर्शन मिळवत आज त्यांनी मशरूम शेतीमध्ये (Mashroom Farming) प्राविण्य मिळवले आहे. विशेष म्हणजे त्यांनी लाकडे आणि अन्य साधनांच्या मदतीने मशरूम लागवडीसाठी प्राथमिकता स्वरूपात कमी खर्चात परिस्थिती तयार केली आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी बाराबंकी जिल्ह्यातील आपल्या फतेहाबाद गावात केवळ एक लाख रुपयांची गुंतवणूक करून त्यांच्या शेतात व्हाइट बटन मशरूमची लागवड सुरू केली. मात्र ते केवळ 2 वर्षात मशरूम शेतीतून वार्षिक 5 ते 6 लाखांचा निव्वळ नफा मिळवत आहे.

किती मिळतंय उत्पन्न?

शेतकरी सतीश कुमार सांगतात, आपण सध्याच्या घडीला सुमारे 3 ते 4 लाख रुपये खर्च करून मशरूमची लागवड करत असून, एका बॅचमधून 5 ते 6 लाख रुपयांचा नफा कमावत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पूर्वी आपण भात, गहू अशा पारंपरिक पिकांच्या माध्यमातून शेती करायचो. त्यातून आपल्याला फायदा मिळत नव्हता. त्यामुळे आपण मश्रूम शेतीकडे वळलो. एका छोटेखानी झोपडीवजा लाकडांपासून बनवलेल्या जागेत आपण मशरूमचे उत्पादन घेत आहोत. ज्यासाठी आपल्याला 3 ते 4 लाखांचा खर्च होतो. तर त्यातून 5 से 6 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. असेही त्यांनी म्हटले आहे.

बटण मशरूमचे फायदे

सतीश कुमार सांगतात, व्हाईट बटन मशरूममध्ये जीवनसत्त्वे आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. मानवी केसांसाठी ते खूप महत्वाचे आहे. केसांची उगवणक्षमता आणि पोषण करण्यासाठी मशरूम अनेक प्रकारे फायदेशीर आहे. पांढरा मशरूम त्यालाच बटण मशरूम देखील म्हटले जाते. हा मशरूम आरोग्यासाठी चांगला मानला जातो. कारण त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.

error: Content is protected !!