Mashroom Farming : मडका पद्धतीने मशरूम उत्पादन; 30 ते 40 दिवसांत मिळते भरघोस उत्पन्न!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात शेतकरी अलीकडे मोठ्या प्रमाणात मशरूम शेतीकडे (Mashroom Farming) वळत आहेत. मुख्य म्हणजे सध्या अनेक पिकांना योग्य तो बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अन्य पर्यायांचा अवलंब करत आहेत. विशेष म्हणजे मशरूम उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या जागेची आवश्यकता नसते. अगदी छोट्याशा जागेतही शेतकरी मोठ्या प्रमाणात मशरूमचे उत्पादन घेऊ शकतात. ज्यामुळे त्यांना अधिकचे उत्पन्न मिळण्यास मदत होते. आज आपण मडक्याच्या मदतीने मशरूमचे उत्पादन (Mashroom Farming) कसे घेतले जाते? याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

काय आहे मडका पद्धती? (Mashroom Farming From Pot Method)

महाराष्ट्रासह देशभरात सध्या मशरूमची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यापूर्वी केवळ शहरी भागांमध्ये मशरूमला मागणी होती. मात्र, गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागात देखील मशरूमची भाजी विशेष प्रसिद्ध झाली आहे. मडका पद्धतीने मशरूम उत्पादन घेण्यासाठी सर्वसाधारणपणे 35 ते 40 दिवसांचा कालावधी लागतो. मशरूम उत्पादन (Mashroom Farming) घेण्यासाठी मडक्याला छिद्रे पाडले जातात. त्यास कापूस लावून बंद केले जाते. तसेच त्याच्या तोंडाला प्लास्टिकची पिशवी बांधली जाते. मडक्यावर दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी टाकले जाते. काही दिवसांनी या छिद्रांमधून कापूस बोळे काढून घेतले जाते.

‘या’ गोष्टींची आवश्यकता

त्यानंतर मडके मशरूम बियाण्याचा रोपणासाठी तयार होते. मडक्यावर रोपण केल्यानंतर 7 ते 8 दिवसांनी मशरूमच्या कळ्या दिसायला सुरुवात होते. त्यानंतर मशरूमवर नियमित पाणी शिंपडणे आवश्यक असते. याशिवाय मशरूम उत्पादनासाठी या कालावधीत दररोज कमीत कमी 4 ते 5 तास मशरूमला ट्यूबलाईटचा प्रकाश मिळणे आवश्यक असते. तसेच आपण तयार केलेल्या शेडमध्ये 75 ते 80 आर्द्रता असणे आवश्यक असते.

किती मिळते उत्पादन?

मडका पद्धतींने मशरूम उत्पादन घेण्यासाठी 35 ते 40 दिवसांचा कालावधी लागतो. एका मडक्यापासून साधारणपणे एक किलोपर्यंत मशरूम मिळते. तर सर्वसाधारणे पद्धतीने त्याच ठिकाणी शेतकऱ्यांना 500 ते 900 ग्रॅमपर्यंत मशरूम मिळते. मडका पद्धतीमध्ये मशरूम उत्पादन घेताना दोन बॅचमध्ये जवळपास 10 ते 15 दिवसांचा कालावधी ठेवला जातो. या पद्धतीत मशरूम काढणीनंतर, प्लास्टिक पिशव्यांमध्ये बांधून थेट बाजारात विक्रीसाठी पाठवला जाऊ शकतो. किंवा मग मशरूम वाळवला देखील जाऊ शकतो. यासाठी तो कपडयात बांधून उन्हात वाळवण्यासाठी ठेवावा लागतो.

error: Content is protected !!