Massey Ferguson : मॅसी फर्ग्यूसनचा अत्याधुनिक ट्रॅक्टर; करतो कमी इंधनात अधिक काम!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात मॅसी फर्ग्यूसन ट्रॅक्टर (Massey Ferguson) निर्माता कंपनीने काळानुरुप आपल्या ट्रॅक्टर्समध्ये बदल केले आहेत. ज्यामुळे मॅसीच्या ट्रॅक्टरची शेतकऱ्यांमध्ये क्रेझ कायम आहे. कंपनीने डायना स्मार्ट सिरीजमध्ये आपल्या अत्याधुनिक ट्रॅक्टरची निर्मिती केली असून, ते सर्वच शेतकऱ्यांच्या चांगलेच पसंतीला उतरत आहेत. आज आपण मॅसी फर्ग्यूसन कंपनीच्या ‘मॅसी फर्ग्यूसन 254 डायना स्मार्ट’ या अत्याधुनिक ट्रॅक्टरबद्दल जाणून घेणार आहोत. जो कमी इंधनात अधिक काम करत असल्याचा दावा कंपनीकडून केला जातो. त्यामुळे आता तुम्ही देखील ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर ‘मॅसी फर्ग्यूसन 254 डायना स्मार्ट’ हा ट्रॅक्टर (Massey Ferguson) तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरणार आहे.

‘254 डायना स्मार्ट’ ट्रॅक्टरबद्दल (Massey Ferguson 254 DynaSmart Tractor)

मॅसी फर्ग्यूसन (Massey Ferguson) कंपनीने आपल्या या ‘254 डायना स्मार्ट’ ट्रॅक्टरला अत्याधुनिक इंजिन दिले आहे. हा ट्रॅक्टर 2700 सीसी क्षमतेसह 3 सिलेंडरमध्ये उपलब्ध आहे. जो 50 एचपी इतकी पॉवर जनरेट करतो. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 35.5 प्रति तास इतका वेग दिलेला आहे. या शक्तिशाली ट्रॅक्टरला 2050 किलोग्रॅमपर्यंत वजन उचलण्याची क्षमता देण्यात आली आहे. आपल्या या डायना स्मार्ट सीरिजच्या ‘254 डायना स्मार्ट’ ट्रॅक्टरला कंपनीने 3642 एमएम लांबी 1784 एमएम रुंदी आणि 1935 / 2035 एमएम व्हीलबेसमध्ये तयार केले आहे. इतकेच नाही तर कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला एकदम स्मार्ट स्टायलिश लुकमध्ये तयार केले आहे. ज्यामुळे हा ट्रॅक्टर खूपच रुबाबदार दिसतो. ज्यामुळे पाहताक्षणी शेतकरी खरेदीसाठी उत्सुकता दाखवत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

काय आहेत फीचर्स?

  • मॅसी फर्ग्यूसन (Massey Ferguson) कंपनीने आपल्या या डायना स्मार्ट सीरिजच्या ‘254 डायना स्मार्ट’ ट्रॅक्टरला पॉवर स्टीयरिंग दिलेली आहे.
  • कंपनीने या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 12 आणि मागील बाजूस 12 रिव्हर्स गिअरसह गिअरबॉक्स दिलेला आहे.
  • या ट्रॅक्टरला ड्युअल क्लच देण्यात आला आहे. जो कॉन्स्टंट मेश टाइप ट्रांसमिशनसह उपलब्ध आहे.
  • ‘254 डायना स्मार्ट’ या ट्रॅक्टरला कंपनीने 58 लीटर क्षमतेची डिझेल टाकी दिली आहे.
  • हा ट्रॅक्टर क्वाड्रा पीटीओ टाइप पावर टेकऑफ येतो. जो 540 आरपीएम निर्मिती करतो.
  • कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला ऑइल इमर्जड ब्रेक्स दिले आहेत.
  • याशिवाय कंपनीने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी ‘254 डायना स्मार्ट’ ट्रॅक्टरला मोबाइल चार्जर, मोबाइल होल्डर, वॉटर बॉटल होल्डर, ट्रान्सपोर्ट लॉक वाल्व, क्वॉड लाइटिंग सिस्टम आणि ‘स्मार्ट की’ सह अनेक फीचर्स देण्यात आले आहे.

किती आहे किंमत?

मॅसी फर्ग्यूसन कंपनीने आपल्या डायना स्मार्ट सीरिजच्या सर्व ट्रॅक्टरची शोरूम किंमत कमीत कमी 7 लाख ते 9 लाख या दरम्यान ठेवली आहे. आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्समुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये या ट्रॅक्टरची एकूण किंमत ही वेगवेगळी राहू शकते. त्यामुळे आता तुम्हीही एखादा स्मार्ट ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर मॅसी फर्ग्यूसन ‘254 डायना स्मार्ट’ हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

error: Content is protected !!