Massey Ferguson : मॅसी फर्ग्युसनचा 20 एचपीचा छोटा ट्रॅक्टर; 3.58 लाख रुपयांमध्ये आहे उपलब्ध!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील शेतकरी छोटे ट्रॅक्टर (Massey Ferguson) खरेदी करण्याकडे आपला कल वळवत आहे. फळबाग शेतीमध्ये छोट्या ट्रॅक्टरची वाढलेली गरज आणि शेतीमध्ये पारंपरिक मशागत पद्धत मागे पडल्याने छोट्या ट्रॅक्टरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील एखादा छोटा ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील नामांकित ट्रॅक्टर निर्माता कंपनीचा मॅसी फर्ग्युसन कंपनीचा ‘5118 4 डब्लूडी’ हा ट्रॅक्टर तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे. आज आपण मॅसी फर्ग्युसन कंपनीच्या ‘5118 4 डब्लूडी’ ट्रॅक्टरबद्दल (Massey Ferguson) जाणून घेणार आहोत.

मॅसी फर्ग्युसनच्या ‘5118 4 डब्लूडी’ ट्रॅक्टरबद्दल (Massey Ferguson 5118 4WD Tractor)

मॅसी फर्ग्युसन (Massey Ferguson) कंपनीने आपल्या ‘5118 4 डब्लूडी’ ट्रॅक्टरला 825 सीसी क्षमता दिली असून, या ट्रॅक्टरला तुम्हाला 1 सिलेंडर पाहायला मिळते. जे 20 हॉर्स पावरची निर्मिती करते. या छोट्या ट्रॅक्टरला उच्च गुणवत्तेचा एअर फिल्टर देण्यात आला आहे. कंपनीने आपल्या ट्रॅक्टरला कमीत कमी 17.2 एचपी पीटीओ पावर दिलेली असून, ट्रॅक्टरचे इंजिन 2400 आरपीएमची निर्मिती करते. कंपनीने आपल्या या छोट्या ट्रॅक्टरला 21.68 किलोमीटर प्रति तास इतका वेग दिला आहे.

याशिवाय कंपनीने आपल्या ट्रॅक्टरला 28.5 लीटर क्षमतेची डिझेल टाकी दिली आहे. मॅसी फर्ग्युसन कंपनीने आपल्या ‘5118 4 डब्लूडी’ ट्रॅक्टरला 750 किलोग्रॅम इतके वजन उचण्याची क्षमता प्रदान केलेली असून, या ट्रॅक्टरचे एकूण वजन 839 किलोग्रॅम इतके आहे. कंपनीने आपल्या या 20 एचपी ट्रॅक्टरला 2610 एमएम लांबी, 950 एमएम रुंदी आणि 1310 एमएम उंचीसह 1420 एमएम व्हीलबेसमध्ये तयार केले आहे.

काय आहेत ‘या’ ट्रॅक्टरचे फीचर्स?

  • कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला मॅन्युअल स्टीयरिंग दिले आहे.
  • पुढील बाजूस 8 आणि मागील बाजूस 2 गिअरसह गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
  • सिंगल डायाफ्राम क्लच देण्यात आला असून, ज्यामध्ये स्लीडिंग मेश टाइप ट्रांसमिशन देण्यात आले आहे.
  • कंपनीचा हा ट्रॅक्टर टू स्पीड पीटीओ पावर टेकऑफसह येतो. जो 540 @ 2180/1478 ERPM निर्मिती करतो.
  • कंपनीने आपल्या या 20 एचपी ट्रॅक्टरला मल्टी डिस्क ऑइल इमर्जड ब्रेक्स दिलेले आहे.
  • मॅसी फर्ग्युसन कंपनीचा हा छोटा ट्रॅक्टर तुम्हाला फोर व्हील ड्राइवसह पाहायला मिळतो.
  • त्याला पुढील बाजूस 5.00 x 12 आकारात आणि 8.00 X 18 आकारात टायर देण्यात आले आहे.

किती आहे किंमत?

मॅसी फर्ग्युसन कंपनीने आपल्या ‘5118 4 डब्लूडी’ ट्रॅक्टरची शोरूम किंमत 3.58 लाख ते 4.02 लाख रुपये इतकी निर्धारित केली आहे. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्समुळे या ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत वेगवेगळी राहू शकते. कंपनीने आपल्या या छोट्या ट्रॅक्टरला 5000 तास किंवा 5 वर्ष इतक्या कालावधीसाठी वॉरंटी प्रदान केलेली आहे.

error: Content is protected !!