Massey Ferguson : शेतकऱ्यांमध्ये मॅसी फर्ग्युसनची क्रेझ कायम; वाचा, ‘241 आर’ची किंमत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय ट्रॅक्टर उद्योगाला (Massey Ferguson) खूप जुनी परंपरा आहे. यामध्ये हिंदुस्थान ट्रॅक्टर, एचएमटी ट्रॅक्टर अशी नावे प्रामुख्याने आपल्या समोर येतात. मात्र या सर्वांमध्ये आजही जुनी परंपरा असलेल्या एका ट्रॅक्टरने आधुनिक वातावरणाशी जुळवून घेत आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. मॅसी फर्ग्युसन 241 आर असे या ट्रॅक्टरचे नाव असून, त्याने आपले आधुनिक रूप धारण करत शेतकऱ्यांमध्ये निर्माण केलेला विश्वास कायम ठेवला आहे. आज आपण मॅसी फर्ग्युसन कंपनीच्या ‘मॅसी फर्ग्युसन 241 आर’ या ट्रॅक्टरबद्दल (Massey Ferguson) जाणून घेणार आहोत.

‘मॅसी फर्ग्युसन 241 आर’ या ट्रॅक्टरबद्दल (Massey Ferguson Craze Continues Among Farmers)

मॅसी फर्ग्युसन (Massey Ferguson) कंपनीच्या ‘मॅसी फर्ग्युसन 241 आर’ बलाढ्य ताकतीचा हा ट्रॅक्टर 2500 सीसी क्षमतेसह 3 सिलेंडरमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला सिम्पसन्स एस 325.1 टी 3 ए इंजिन दिले असून, हा ट्रॅक्टर तुम्हाला 42 एचपीमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला सर्वोच्च क्षमतेचा एअर फिल्टर दिला आहे. या ‘मॅसी फर्ग्युसन 241 आर’ ट्रॅक्टरची कमीत कमी पीटीओ पॉवर 36 एचपी इतकी आहे. ज्यामुळे सर्व कृषी अवजारे चालवताना शेतकऱ्यांना अगदी सहज ट्रॅक्टर चालवण्याचा अनुभव येतो.

‘मॅसी फर्ग्युसन 241 आर’ या ट्रॅक्टरला कंपनीने 29.37 किलोमीटर प्रति तास इतका वेग दिलेला आहे. याशिवाय कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 1700 किलो इतके वजन उचलण्याची क्षमता दिली असून, त्याचे वजन कंपनीकडून 1730 किलो इतके ठेवण्यात आले आहे. मॅसी फर्ग्युसन कंपनीने आपल्या ‘मॅसी फर्ग्युसन 241 आर’ या ट्रॅक्टरला 3290 एमएम लांबी, 1660 एमएम रुंदीसह 1830 एमएम व्हीलबेसमध्ये तयार केले आहे.

‘मॅसी फर्ग्युसन 241 आर’ ट्रॅक्टरचे फीचर्स

  • कंपनीने ‘मॅसी फर्ग्युसन 241 आर’ या ट्रॅक्टरला (Massey Ferguson) मॅन्युअल स्टीयरिंग दिली आहे.
  • याशिवाय तुम्हाला या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 8 आणि 2 गिअरसह गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
  • कंपनीने आपल्या ट्रॅक्टरला ड्युअल टाइप क्लच दिला आहे. ज्यामध्ये तुम्हाला स्लीडिंग मेश ट्रांसमिशन देण्यात आले आहे.
  • कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 47 लीटर क्षमतेची डिझेल टाकी दिलेली आहे.
  • मॅसी फर्ग्युसन कंपनीचा ‘मॅसी फर्ग्युसन 241 आर’ हा ट्रॅक्टर तुम्हाला लाईव्ह सिक्स स्प्लिन्ड शाफ्ट टाइप पावर टेकऑफसह येतो.
  • हा ट्रॅक्टर 2 व्हील ड्राइवसह उपलब्ध आहे.
  • तसेच त्याला पुढील बाजूस 6.00 x 16 आकारात आणि मागील बाजूस 12.4 x 28 आकारात टायर देण्यात आले आहे.

किती आहे किंमत?

मॅसी फर्ग्युसन कंपनीने आपल्या ‘मॅसी फर्ग्युसन 241 आर’ या शक्तिशाली ट्रॅक्टरची शोरूम किंमत 6.63 लाख ते 6.99 लाख रुपये इतकी निर्धारित केली आहे. मात्र, आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्स वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळा आहे. ज्यामुळे तुम्हाला या ट्रॅक्टरची किंमत थोड्या फार फरकात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पाहायला मिळू शकते.

error: Content is protected !!