Massey Ferguson Tractor : मॅसी फर्ग्युसन कंपनीचा ‘हा’ आहे शक्तिशाली ट्रॅक्टर; वाचा किंमत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मॅसी फर्ग्युसन या ट्रॅक्टर निर्माता कंपनीचे ट्रॅक्टर (Massey Ferguson Tractor) गावागावात पाहायला मिळतात. ताकद आणि बलाढ्यपणामुळे ओळखल्या जाणाऱ्या मॅसी ट्रॅक्टर्सला शेतकऱ्यांची मोठी पसंती असते. मॅसी फर्ग्युसन ही ट्रॅक्टर उद्योगातील सर्वात जुनी कंपनी असल्याने, मॅसीच्या सर्व ट्रॅक्टरवर शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे. आता तुम्ही देखील एखादा ताकतवान ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर मॅसी फर्ग्युसन कंपनीचा 9500 4WD हा ट्रॅक्टर तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो. आज आपण ‘मॅसी फर्ग्युसन 9500 4WD’ या ट्रॅक्टरबद्दल (Massey Ferguson Tractor) सविस्तर जाणून घेणार आहोत.

‘मॅसी फर्ग्युसन 9500 4WD’ ट्रॅक्टरबद्दल (Massey Ferguson Tractor For Farmers)

‘मॅसी फर्ग्युसन 9500 4WD’ हा ट्रॅक्टर (Massey Ferguson Tractor) तुम्हाला कंपनीने 2700 सीसी क्षमतेसह 3 सिलेंडरमध्ये वॉटर कुलिंग सिस्टीमसह उपलब्ध करून दिलेला आहे. जो 58 एचपी इतकी पॉवर निर्माण करतो. त्याची कमीत कमी पीटीओ पॉवर ही 55 एचपी इतकी आहे. जी ट्रॅक्टरला सर्व प्रकारचे उपकरणे जोडून शेतामध्ये काम करायला पर्याप्त मानली जाते. या ट्रॅक्टरला कंपनीने 60 लीटर क्षमतेची डिझेल टाकी दिलेली आहे. ज्यामुळे तुम्हाला अधिक काळापर्यत वारंवार डिझेल आणण्याची गरज पडत नाही. आपल्या या ट्रॅक्टरला कंपनीने 9500 किलोग्रॅम इतके वजन उचलण्याची क्षमता दिलेली आहे. तसेच या ट्रॅक्टरचे वजन हे 2050 किलोग्रॅम इतके आहे. या ट्रॅक्टरला कंपनीने 3914 एमएम लांबी आणि 1850 एमएम रूंदीसह 1972 एमएम व्हीलबेसमध्ये तयार केलेले आहे. कंपनीचा हा ट्रॅक्टर प्रामुख्याने 379 एमएम ग्राउंड क्लीयरन्ससह तयार करण्यात आला आहे.

काय आहेत फीचर्स

  • ‘मॅसी फर्ग्युसन 9500 4WD’ ट्रॅक्टरला (Massey Ferguson Tractor) कंपनीने पॉवर स्टीयरिंग दिलेली आहे. ज्यामुळे चालकाला आरामदायी अनुभव मिळतो.
  • कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 8 आणि मागील 8 गिअरसह गिअरबॉक्स दिलेला आहे.
  • हा ट्रॅक्टर तुम्हाला ड्युअल क्लचसह येतो. ज्यास कॉम्पीमेश टाइप ट्रांसमिशन देण्यात आले आहे.
  • कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला ऑइल इमर्जड ब्रेक दिलेला आहे. जो ट्रॅक्टरवर अचानक नियंत्रण मिळवण्यासाठी खूप उपयोगी येतो.
  • ‘मॅसी फर्ग्युसन 9500 4WD’ ट्रॅक्टरला कंपनीने पुढील बाजूस 31.3 किमी प्रति तास तर मागील बाजूस 12.9 किमी प्रति तास इतका वेग दिलेला आहे.
  • हा ट्रॅक्टर फोर व्हील ड्राइवमध्ये उपलब्ध आहे. ज्यास 9.50 x 24 फ्रंट टायर आणि रियर टायर पाहायला मिळतात.

किती आहे किंमत?

मॅसी फर्ग्युसन आपल्या या ‘मॅसी फर्ग्युसन 9500 4WD’ शक्तिशाली ट्रॅक्टरची किंमत भारतीय शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन, अत्यंत अल्प निर्धारित केली आहे. कंपनीने या ट्रॅक्टरची शोरूम किंमत 11.24 लाख से 11.55 लाख रुपये इतकी निश्चित केलेली आहे. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्स यामुळे ऑन रोड किमतीमध्ये वेगवेगळया भागात बदल असू शकतो. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 4 वर्ष इतकी वारंटी दिलेली आहे.

error: Content is protected !!