Medicinal Plants : ‘ही’ आहे प्रमुख पाच औषधी वनस्पतींची शेती करणारे राज्य; पहा.. महाराष्ट्राचा क्रमांक!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला औषधी वनस्पतींच्या (Medicinal Plants) पाने, फुले, फळे, साल, मुळ्या अशा सर्वच घटकांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. औषधी वनस्पतींमध्ये अनेक गुणधर्म असतात. ज्यामुळे औषध निर्माण क्षेत्रामध्ये देखील त्यास नेहमीच मोठी मागणी असते. परिणामी, शेतकऱ्यांना औषधी वनस्पतीच्या लागवडीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवता येते. याच पार्श्वभूमीवर आपल्या देशामध्ये सर्वाधिक औषधी वनस्पतींची शेती नेमकी कोणत्या राज्यामध्ये केली जाते? कोणते पाच राज्य सर्वाधिक औषधी वनस्पतींची (Medicinal Plants) शेती करतात? या पहिल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राला स्थान आहे का? या तिन्ही प्रश्नांची उत्तरे आज आपण या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

राजस्थान पहिल्या क्रमांकावर (Medicinal Plants Top Five States In India)

औषधी वनस्पतींचा (Medicinal Plants) वापर फार्मसी क्षेत्रात प्रामुख्याने होतो. देशातच नाही तर विदेशात देखील त्यांना मोठी मागणी असते. देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या औषधी वनस्पतींच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. अनेक शेतकरी औषधी वनस्पतींच्या लागवडीतून मोठ्या प्रमाणात नफा मिळवत आहे. देशात सर्वाधिक औषधी वनस्पतींची लागवड राजस्थान या राज्यामध्ये होते. देशातील एकूण औषधी वनस्पतींच्या उत्पादनापैकी राजस्थानमध्ये 37.01 टक्के उत्पादन घेतले जाते. तर दक्षिणेकडील राज्य असलेले तामिळनाडू हे राज्य देशातील एकूण औषधी वनस्पतींच्या लागवडीपैकी 23.58 टक्के उत्पादन घेत, दुसऱ्या क्रमांकावर आहे.

‘या’ औषधी वनस्पतींची होते लागवड

औषधी वनस्पतींच्या शेतीमध्ये प्रामुख्याने अश्वगंधा, कोरफड, शतावरी, गवती चहा, पाल्मरोझा, अडुळसा, ब्राम्ही, सर्पगंधा, वेखंड, अनंतमूळ, कालमेघ, तुळस, सदाफुली, पिंपळी, सफेदमुसली, चंदन, गावठी गुलाब, माका, नानारी, दशमूल, कचोरा, सिट्रोनेला, पुदिना, जिरेनियम, आवळा अशा अनेक औषधी वनस्पतीची लागवड केली जाते. देशातील एकूण औषधी वनस्पतींच्या लागवडीमध्ये 19.78 टक्के उत्पादनासह मध्य प्रदेश हे राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पाच राज्यांमध्ये 90 टक्के उत्पादन

भारतात प्रामुख्याने कमी उत्पादकता असलेल्या जमिनीमध्ये औषधी वनस्पतींची लागवड केली जाते. दरम्यान, 7.22 टक्के उत्पादनासह छत्तीसगड राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. तर देशातील औषधी वनस्पतींच्या लागवडीत बिहार या राज्याच्या देशात पाचवा क्रमांक लागतो. बिहारमध्ये देशातील एकूण उत्पादनापैकी 3.59 टक्के उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्राला देशातील औषधी वनस्पतींच्या उत्पादनामध्ये पहिल्या पाच राज्यांमध्ये स्थान नाही. वरील पाच राज्यांमध्ये देशातील एकूण औषधी वनस्पतींच्या उत्पादनापैकी 90 टक्के उत्पादन होते.

error: Content is protected !!