शेतकऱ्यांना ‘या’ तारखेपासून मिळणार बियाणे आणि खते; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी | शेतकऱ्यांची आलेल्या पावसामुळे धावपळ उडाली आहे. त्याला आता पेरणीचे वेध लागले आहेत. त्यामुळे, बियाणे आणि खते यांची जुळवणी शेतकरी करत आहे. शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी बियाणे आणि खते मिळावे, यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी शेतकऱ्यांना 25 तारखेपासून बियाणे आणि खते मिळणार आहेत. यापूर्वीही, तारीख 30 मे रोजी ठरली होती. पण, शासनाने मुदतपूर्व पाच दिवस आधीच बियाणे आणि खतांची तजवीज केली आहे.

खरीप हंगामाचे पेरणी लवकरच सुरू होईल. या दृष्टिकोनातून राज्य शासनाने घेतलेल्या बैठकीमध्ये खते आणि बियाणे यासंदर्भात विषय मांडण्यात आला. सध्याची स्थिती पाहता पाच दिवस आधी शेतकऱ्यांना बियाणे आणि खते देण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. त्यामुळे तीस तारखेला न मिळता पाच दिवस आधी, म्हणजे 25 मे पासूनच शेतकऱ्यांना खते मिळतील. बैठकीनंतर, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्य शासनाच्या खते आणि बियाणे उपलब्धतेबाबत निर्णयाची सविस्तर माहिती दिली.

शेतकऱ्यांना बियाणे जरी लवकर मिळाली तरी, त्यांनी त्याची पेरणी पावसानंतरच करावी. जेणेकरून पीक उगवण्यास कोणतीही अडचण येणार नाही. व शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार नाही. तसेच, राज्यात करोणा विषयक निर्बंध असल्यामुळे, राज्य सरकारने कृषी विषयक दुकाने सकाळी दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या वेळेत बियाणे आणि खते खरेदी करता येऊ शकतील.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा👇🏼👇🏼👇🏼*
https://chat.whatsapp.com/GkHDokKFuPu1dQERW7Urj7

Leave a Comment

error: Content is protected !!