हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाच्या (Micro Irrigation) माध्यमातून अधिकाधिक उत्पन्न मिळवता यावे. यासाठी राज्य सरकारकडून ‘प्रतिथेंब अधिक पीक’ ही योजना राबवली जात आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून ही योजना राज्यात राबवली जात असून, या योजनेत केंद्राचा 60 टक्के तर राज्य सरकारचा 40 टक्के हिस्सा आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हीही ठिबक व तुषार संच उभारणीसाठी (Micro Irrigation) अर्ज करून लाभ मिळवू शकतात. चला तर मग पाहूया… या योजनेद्वारे अनुदान कसे मिळवायचे.
किती मिळते अनुदान? (Micro Irrigation Apply For Drip System)
ही सूक्ष्म सिंचन (Micro Irrigation) योजना राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान 5 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यात येते. राज्य सरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या सोयीकरीता सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी महाडीबीटी प्रणाली विकसित केली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या घटकांच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून, शेतकऱ्यांना शेतीशी निगडीत विविध घटकांकरिता अर्ज करण्याची सुविधा या प्रणालीद्वारे करून देण्यात आली आहे.
कसा कराल अर्ज?
शेतकरी मित्रांनो, तुम्हांला राज्य सरकारच्या कोणत्याही सरकारी योजनेचा खात्रीशीरपणे अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अॅप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही तुमची नोंदणी करा. त्यानंतर या अॅॅपच्या माध्यमातून तुम्ही शेतीच्या सर्व योजनांचे खात्रीशीरपणे अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे ठिबक व तुषार संच उभारणीसाठीचे अनुदान मिळवण्यासाठी अॅपमध्ये जाऊन “सरकारी योजना” यावर क्लिक करून तुम्ही आपला ड्रीप अनुदानाचा अर्ज भरू शकतात.
सरकारी योजना या सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हांला स्वतःची नोंदणी करावी लागेल. याशिवाय आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. याशिवाय हा अर्ज तुम्ही स्वतःच्या मोबाईल, संगणक/लॅपटॉप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातूनही करु शकतात.
आवश्यक कागदपत्रे
- उमेदवाराचे ओळखपत्र (आधार कार्ड व पॅन कार्ड)
- डिजिटल सातबारा
- रेशन कार्ड
- खरेदी केलेल्या साहित्याचे जीएसटी बिल
- पूर्वसंमती
- जात प्रमाणपत्र
- विज बिल झेरॉक्स
- पासबुक झेरॉक्स
योजनेचे फायदे
ठिबक व तुषार संच उभारणी योजनेतून शेतकरी लाभार्थीस अनेक फायदे आहेत. ठिंबक सिंचनामुळे पाणी थेट पिकाच्या मुळाशी व आवश्यक त्या प्रमाणात दिले जाते, त्यामुळे पाण्याची बचत होते. शिवाय कमी पाण्यात अधिक पीक घेता येते. ठिंबक सिंचनामुळे जमिनीत वाफसा कायम राहतो. विद्राव्य खते वेंचुरी/फर्टिलायझर टॅकद्वारे पाण्यात मिसळून पिकांच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार देता येतात. त्यामुळे पाण्याची व खतांची बचत होऊन खतांचा अधिक कार्यक्षमतेने वापर होतो. तणांची वाढ नियंत्रित राहते, विजेच्या व मजुरांच्या खर्चात बचत होते. पिकांच्या उत्पादनात व गुणवत्तेत वाढ होऊन दर्जेदार व निर्यातक्षम उत्पन्न मिळते आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावते.