Milk Dairy in Every Village: राज्यात गाव तिथे शासकीय दूध डेअरी सुरू करण्याचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील दुग्ध व्यवसाय (Milk Dairy In Every Village) वाढविणे आणि पशुपालकांना सक्षम करण्यासाठी महानंद डेअरीला (Mahananda Dairy) ऊर्जितावस्था देण्यासाठी राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिव तुकाराम मुंढे यांचे प्रयत्न सुरू आहेत.

त्यातूनच त्यांनी राज्यात गाव तिथे शासकीय दूध डेअरी (Milk Dairy In Every Village) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच ते राज्यातील शासकीय दूध डेअरीचा कारभार जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या (District Deputy Commissioner of Animal Husbandry ) हाती देणार आहेत.

गुजरातमधील अमूलच्या (Amul) प्रगतीच्या कथा येत असताना, महाराष्ट्रातही स्वतःचा ब्रँड असावा, अशी मागणी जोर धरू लागली. त्याला मराठी अस्मितेची किनार होती. त्यातून 18 ऑगस्ट 1983 महानंद हा ब्रँड सुरू झाला.

सुरुवातीच्या 35 वर्षांमध्ये या संस्थेने समाधानकारक प्रगती केली, परंतु त्यानंतर डेअरी क्षेत्रातील राजकीय हस्तक्षेपामुळे खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू झाला. महानंद दूध सहकारी संघांची शिखर संस्था असतानाही त्या छत्राखाली सर्व सहकारी दूध उत्पादकांनी येण्यास नकार दिला.

जिल्हा दूध संघांना (Milk Dairy In Every Village) राजकीय फायद्यासाठी स्वत:ची जहागीरदारी टिकवायची होती. एनडीडीपीमार्फत आधुनिकि‍करणासाठी मिळालेल्या निधीचा गैरवापर करण्याकडेच सर्व दूध संघांचे लक्ष होते. त्यातून संचालकांच्या तिजोरी भरण्याचे काम मोठ्या प्रमाणावर झाले.

आताही अनेक सहकारी दूध संघांच्या ताब्यात मोक्याच्या जागा आहेत. पण शेतकर्‍यांच्या हितासाठी महानंद डेअरी आणि जिल्हास्तरीय शासकीय डेअरी वाचविण्यासाठी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. महानंद आणि शेतकर्‍यांना सक्षम करण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात शासकीय दूध डेअरी (Government Milk Dairy) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठीच त्यांनी जिल्हास्तरीय शासकीय डेअरीचा (Milk Dairy In Every Village) सर्व कारभार जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 1 मे 2024 पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. जिल्ह्यातील सर्व सहकारी दूध संघ, खासगी डेअरींचे नियंत्रण जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांकडे असणार आहे.

व्हेटर्नरी क्लिनिकने एक उद्योजक बनवावा
नव्याने होणार्‍या व्हेटर्नरी क्लिनिकमधील डॉक्टरने आपल्या परिसरातील एका पशुपालकास उद्योजक बनविण्यासाठी मार्गदर्शन करून उभा केले पाहिजे, अशा सूचना तुकाराम मुंढे यांनी पुणे येथील कार्यशाळेत दिल्या आहेत. मुंढे यांची कार्यशाळा झाल्यापासून जिल्हा पशु वैद्यकीय उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आळस झटकून कामाला लागले आहेत. पशुसंवर्धन विकास अधिकारी आणि कार्यालयीन कर्मचार्‍यांनाही त्यांनी कामाला लावले आहे.

error: Content is protected !!