Milk MSP : ‘या’ राज्यात गायीच्या दुधाला 45 रुपये हमीभाव; अर्थसंकल्पात मोठी घोषणा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे महाराष्ट्रात दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी योग्य भाव (Milk MSP) मिळत नाहीये. असे असतानाच आता देशातील हिमाचल प्रदेश या राज्यात तेथील राज्य सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची घोषणा करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी आज (ता.17) आपल्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर करताना (Milk MSP) ही घोषणा केली आहे.

किती मिळणार दुधाला हमीभाव? (Milk MSP In Himachal Pradesh)

अर्थमंत्रीपद स्वतःकडे ठेवणाऱ्या मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटले की, “हिमाचल प्रदेशमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून गायीच्या दुधाच्या हमीभावात (Milk MSP) 38 रुपये प्रति लिटरहून 45 रुपये प्रति लिटर इतकी वाढ तर म्हशीच्या दुधाच्या हमीभावात 38 रुपयेहून 55 रुपये प्रति लिटरपर्यंत वाढ करण्यात येत आहे.” त्यामुळे आता हिमाचल प्रदेश हे राज्य देशात दुधासाठी हमीभाव देणारे पहिले राज्य ठरले असून, तेथील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता गायीच्या दुधासाठी 45 रुपये प्रति लिटर तर म्हशीच्या दुधासाठी 55 रुपये प्रति लिटर इतका हमीभाव राज्य सरकारकडून मिळणार आहे.

खुल्या बाजारात विक्रीस मुभा

मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू पुढे बोलताना म्हटले आहे की, राज्यातील शेतकऱ्यांना खुल्या बाजारात दुधास योग्य दर मिळत असेल तर ते खुल्या बाजारातही आपली दूध विक्री करू शकतात. याशिवाय राज्यातील बाजार समित्यांमध्ये दूध विक्रीस आलेल्या शेतकऱ्यांकडून यापूर्वी काही शुल्क आकारले जात होते. मात्र आता 1 एप्रिल 2024 पासून बाजार समित्यांमध्ये हमीभावाने दूध विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

याशिवाय मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील शेतकऱ्यांसाठी राजीव गांधी नैसर्गिक शेती योजनेची घोषणा केली आहे. ज्याद्वारे प्रत्येक गावातून 10 अशा एकूण 36 हजार शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे हिमाचल प्रदेश सरकारकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय 2026 पर्यंत हिमाचल प्रदेश राज्यास हरित राज्य बनवण्याचा संकल्प करण्यात आल्याचेही त्यांनी सभागृहात म्हटले आहे.

error: Content is protected !!