Milk Price : उन्हाळ्यामुळे दुधाचे दर वाढणार; राज्यातील दूध संकलनात मोठी घट!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शिगेला पोचलेला उन्हाळा आणि हळूहळू कमी होणारे दूध संकलन (Milk Price) यामुळे पुढील काही दिवसांत शेतकऱ्यांना दूध विक्रीचे (Milk Price) दर वाढवून मिळण्याची शक्यता आहे. मागणीत मोठी वाढ नसतानाही, दूध संकलनात घट झाल्यामुळे दूध टंचाईसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. दुधाचे दर वाढण्यामागे उन्हाळा आणि कमी खरेदी दर हे दोन्ही घटक जबाबदार आहेत. उन्हाळ्यामुळे गायींचे दूध कमी होते आणि दुसरीकडे, दूध खरेदी दर (Milk Price) कमी असल्यामुळे अनेक शेतकरी दूध विक्रीसाठी आणत नाहीत. परिणामी, राज्यातील एकूण दूध संकलनात 8 ते 10 टक्के घट झाली आहे.

पुढील महिन्यापासून वाढीची शक्यता (Milk Price In Maharashtra)

दरम्यान, दुधाच्या मागणीत वाढ नसली तरी, कमी संकलनामुळे दूधाचे दर (Milk Price) वाढू शकतात. शेतकऱ्यांना चांगले दर मिळण्यासाठी पुढच्या महिन्यापासून दूध दर वाढण्याची शक्यता आहे. सध्या तरी ही दूध दरवाढ किती असेल? याचा अंदाज लावणे कठीण आहे. लोणी आणि दूध भुकटी यांच्या बाजारपेठेतील स्थिती देखील दूध दरवाढीसाठी महत्त्वपूर्ण आहे. सध्या लोणीचे दर प्रतिकिलो 330 रुपयांवर आणि दूध भुकटीचे दर 215 ते 225 रुपयांपर्यंत आहेत. जर या पदार्थांचे दर भविष्यात वाढले तर शेतकऱ्यांना दूध विक्रीसाठी चांगले दर मिळण्याची शक्यता आहे.

दरवाढीचे संभाव्य परिणाम

दुग्ध व्यवसायातील जाणकारांच्या मते, “जर लोणी आणि दूध भुकटीचे दर भविष्यात वाढले तर परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना दूधाचे दर (Milk Price) वाढवून देण्यास दूध प्रकल्पांना अनुकूलता निर्माण होईल.”दुसरीकडे, श्रीपाद चितळे, संचालक, चितळे डेअरी उद्योग समूह यांच्या मते, दूध भुकटी आणि लोणीचे दर अपेक्षित प्रमाणात वाढलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरात निश्चित किती आणि केव्हा वाढ होईल हे सांगणे कठीण आहे. दूध संकलनात घट आणि उन्हाळा यामुळे पुढील काही दिवसांत दूध दरवाढीची शक्यता आहे. तथापि, मागणीतील बदल आणि इतर घटकांवरही दरवाढ अवलंबून आहे. शेतकऱ्यांना चांगले दर मिळण्यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत वाढ होणे आवश्यक आहे.

error: Content is protected !!