Milk Production : म्हशीने 20, गायीने 40 लिटर दूध देत मिळवला पहिला क्रमांक; ‘गोकुळ’ची स्पर्धा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारला असून, राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन (Milk Production) घेतात. दूध उत्पादन घेण्यात स्पर्धा निर्माण व्हावी, या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यातील ‘गोकुळ’ या दूध उत्पादक संघाकडून दूध उत्पादक शेकऱ्यांसाठी एक स्पर्धा घेतली जाते. यावर्षी एका जाफराबादी म्हशीने दैनिक दोन वेळचे 20 लिटर 580 मिली तर एका होलस्टीन फ्रिजियन जातीच्या गाईने दोन वेळचे 40 लिटर 225 मिली दूध देत प्रथम क्रमांक मिळवला आहे. या योजनेमुळे (Milk Production) शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न घेण्यास प्रोत्साहन मिळते.

‘हे’ शेतकरी ठरले मानकरी (Milk Production Gokul Competition)

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ या दूध उत्पादक संघाकडून (Milk Production) नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी ही स्पर्धा घेण्यात आली होती. गोकुळकडून प्रामुख्याने शेतकऱ्यांना दूध उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. या स्पर्धेमध्ये यावर्षी लिंगनूर कसबा नूल येथील शेतकरी विजय दळवी यांच्या जाफराबादी म्हशीने दैनिक दोन वेळचे 20 लिटर 580 मिली तर सरवडे नावाचे शेतकरी शांताराम साठे यांच्या होलस्टीन फ्रिजियन जातीच्या गाईने दोन वेळचे 40 लिटर 225 मिली दूध देत प्रथम क्रमांक मिळवला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, जातिवंत गाई-म्हशींची खरेदी करणे, त्यांचे व्यवस्थित संगोपन करणे, गाई-म्हशीचे दूध उत्पादन वाढवण्यासोबतच दुग्ध व्यवसायामधून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.

म्हैस गटाचे विजेते

2023-24 या वर्षासाठी म्हैस या गटासाठी शेतकरी विजय विठ्ठल दळवी हे म्हशीच्या दोन वेळेच्या 20.580 लिटर दुधासह प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले असून, त्यांना 30,000 रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. शेतकरी शुभम कृष्णा मोरे यांनी 19.500 लिटर दुधासह द्वितीय क्रमांक पटकावला असून, त्यांना 25,000 रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. तर शेतकरी वंदना संजय जरळी यांनी 19.340 लिटर दुधासह तिसरा क्रमांक पटकावला असून, त्यांना 20,000 रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.

गाय गटाचे विजेते

2023-24 या वर्षासाठी गाय या गटासाठी शेतकरी शांताराम आनंदा साठे यांनी 40.225 लिटर दुधासह प्रथम क्रमांक पटकावला असून, त्यांना 25,000 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. शेतकरी दीपक संभाजी सावेकर यांनी 31.110 लिटर दुधासह द्वितीय क्रमांक पटकावला असून, त्यांना 20,000 रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. तर शेतकरी करीम महमदह नीफ मुल्ला यांनी 30.820 लिटर दुधासह तिसरा क्रमांक मिळवला आहे. त्यांना 15,000 रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.

error: Content is protected !!