Milk Production : ‘या’ सहा गोष्टी करा; प्रति गाय दूध उत्पादन वार्षिक 200 लिटरने वाढेल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दुग्ध व्यवसायाने (Milk Production) शेतकऱ्यांमध्ये एक क्रेझ निर्माण केली आहे. ज्यामुळे दशभरापूर्वी शेतकऱ्यांकडे स्थानिक गावठी गायींचे प्रमाण अधिक आढळून येत होते. मात्र, सध्या सर्वच शेतकरी अधिक दूध उत्पादन मिळवण्यासाठी संकरित होलस्टीन फ्रिजियन या विदेशी गायीचे पालन करताना दिसून येत आहे. अर्थात अधिक दूध देणाऱ्या गायी गोठ्यात दावणीला असल्या तरीही शेतकऱ्यांना दूध उत्पादनातील घटीला सामोरे जावे लागते. यामागे अनेक कारणे असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या गायींच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासह, काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. ज्यामुळे शेतकऱ्यांना प्रति गाय वार्षिक २०० लिटरपर्यंत दूध उत्पादन (Milk Production) वाढवण्यास मदत होते.

वातावरणीय बदलाचा फटका (Milk Production In Maharashtra)

दूध व्यवसाय करताना शेतकऱ्यांना वातावरण बदलाचा सर्वात मोठा फटका बसत असतो. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तीनही ऋतूंमध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कारणांनी दूध उत्पादनातील (Milk Production) घटीला सामोरे जावे लागते. प्रामुख्याने दुधाळ जनावरास पावसाळ्यात आजार बळावतात. उन्हाळयात वाढत्या उष्णतेच्या त्रास होते. त्यामुळे दुधाळ जनावर कमी दूध देते. हे कमी की काय? दुधाच्या दराची पडझड सुरूच असते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. मात्र, आता पुढील सहा उपाय करत शेतकरी प्रति गाय वार्षिक 200 लिटरपर्यंत वाढ करू शकतात.

‘हे’ आहेत दुधवाढीसाठीचे सहा उपाय?

  • शेतकऱ्यांनी वर्षातून किमान दोन वेळा दुधाळ जनावरांच्या पायांचे खुर घासणे आवश्यक असते. असे केल्याने संबंधित दुधाळ जनावर वर्षातून 50 लीटरपर्यंत अधिक दूध देते.
  • शेतकऱ्यांनी दुधाळ जनावरांचे वेळोवेळी लसीकरण केल्यास संबंधित गाय किंवा म्हैस वर्षातून 50 लीटर अधिक दूध देते.
  • दुधाळ जनावरांना पशुवैद्यकांच्या सल्ल्याने वेळोवेळी जंतनाशक गोळ्या देणे आवश्यक असते. ज्यामुळे संबंधित दुधाळ जनावर वार्षिक पन्नास लीटरपर्यंत अधिक दूध देते.
  • गोठ्यातील तापमान संतुलित ठेवल्यामुळे आणि जनावरांसाठी फॉगरचा उपयोग केल्यामुळे वर्षभरात 100 लीटर दूध वाढते.
  • जनावरांच्या दगडी आजारावर कंट्रोल केल्यास वर्षभरात जनावरचे दूध 200 लिटर पर्यंत वाढू शकते.
  • जनावरांची राईस प्लेट म्हणजे जनावरांना संतुलित आहार वेळेवर भेटला तर जनावरांचे दूध वर्षभरामध्ये 200 लीटरने वाढते.
error: Content is protected !!