Milk Rate : राज्यात बरेच शेतकरी हे दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहेत. दुग्धव्यवसायय करून शेतकऱ्यांना चांगले आर्थिक सहाय्य मिळते म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांचा कल हा दुग्ध व्यवसायाकडे वळला आहे. मात्र आता दुग्ध व्यवसाय करून देखील परवडत नसल्याचे शेतकरी म्हणत आहेत. त्याचं कारण असं की, मागच्या काही दिवसापासून दुधाचे दर कमी झाले आहेत. आणि पशुंच्या खाद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे . यामुळे शेतकऱ्यांनी दुधाचे दर वाढावे यासाठी काही आंदोलने देखील केली होती.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा
त्यानंतर शेतकऱ्यांच्या नाराजीची दखल घेत सरकारने राज्यात गायीच्या दुधासाठी 3.5/8.5 गुणप्रतिस 34 रुपये दर देणे बंधनकारक असल्याचा अध्यादेश जारी केला. असे असले तरी खासगी दूध खरेदी संघ कमी प्रतीच्या दुधाला एक रुपयाने दर रिव्हर्स करू लागले आहेत. त्यामुळे जरी दूध दर निश्चित झाला असला तरी शेतकऱ्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे खूपच कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी सरकारवर निशाणा साधत आहेत. खासगी दूध संघानी SNF कमी बसली तर प्रति पॉइंटला एक रुपया तर फॅट कमी बसली तर प्रत्येक पॉइंटला 50 पैसे कमी केले आहेत. त्यामुळे आता दुधाला खूप कमी दर मिळत आहे. (Milk Rate )
मागच्या काही दिवसापूर्वी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सर्व शेतकरी संघटना आणि दूध संघाचे मालक यांची संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी दुधाचा दर 34 रुपये निश्चित केला होता मात्र दुधाचा दर निश्चित करून देखील जुन्याच दराने दूध खरेदी केले जात असल्याने शेतकरी पुन्हा एकदा संतप्त झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर सतत निशाणा साधणारे खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. राजू शेट्टी म्हणाले , “जरी गायीच्या दुधाला 34 रुपये दर देण्याचा अध्यादेश राज्य शासनाने काढला असला तरी हा अध्यादेश म्हणजे दूध उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. अशी जोरदार टीका त्यांनी सरकारवर केली आहे