Milk Rate : पाकिस्तानात महागाईचा भडका; दुधाला मिळतोय 210 रूपये प्रति लिटरचा भाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दूध उत्पादक (Milk Rate) शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे दूध उत्पादनाचा खर्च वाढलेला असताना दुसरीकडे मात्र दुधाला 25 ते 27 रुपये प्रति लिटरचा दर मिळत आहे. मात्र, शेजारील देश असलेल्या पाकिस्तानात सध्या याउलट परिस्थिती असून, त्या ठिकाणी एक लिटर दुधासाठी नागरिकांना 210 रूपये मोजावे लागत आहे. नुकतीच कराची येथील आयुक्तांनी पाकिस्तानातील डेअरी फार्मर्स असोसिएशनच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यात दुधाच्या दरात 10 रुपयांनी वाढ करण्यात आली असून, सध्या पाकिस्तानात एक लिटर दुधाची किंमत (Milk Rate) 210 रूपये इतकी झाली आहे.

मैदा, डाळी, तांदूळही महागला (Milk Rate In Pakistan)

पाकिस्तामध्ये फक्त दूधच (Milk Rate) नाही, तर मैदा, डाळी, तांदूळ देखील महागले आहेत. पाकिस्तानमध्ये एक किलो तांदूळ 200 ते 450 रुपये किलो दराने विकला जात आहे. तर डाळ 150 ते 400 रुपये किलो दराने विकली जात आहे. देशातील महागाई कमी होत असताना पाकिस्तानमध्ये खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे एका नामांकित वृत्तसमूहाने म्हटले आहे.

खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ

मागील वर्षी मे महिन्यामध्ये महागाईने पाकिस्तानमध्ये उच्चांक गाठला होता. तिथे महागाईचा दर 38 टक्क्यांच्या पुढे गेला होता. तो आशियातील सर्वाधिक दर होता. पाकिस्तानात गेल्या वर्षभरात खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झालेली पाहिली तर सरकारी आकडेवारीनुसार शहरी भागात टोमॅटोचे भाव 188 टक्के, कांद्याचे 84 टक्के, मसाल्याच्या 49 टक्के, साखरेच्या किमतीत 37 टक्क्यांनी तर मटनाच्या किमतीत 22 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचेही या वृत्तसमूहाने म्हटले आहे.

दरम्यान, पाकिस्तानी लोकांसाठी लवकरच प्रति लिटर दुधात 50 पीकेआर वाढ होण्याची शक्यता आहे. दूध उत्पादनाचा वाढता खर्च, जनावरांच्या वाढत्या किमती आणि सरकारचे दुर्लक्ष यामुळे दुधाच्या दरात अचानक वाढ दिसून आली आहे. असे पाकिस्तानातील डेअरी फार्मर्सचे अध्यक्ष मुबाशेर कादिर अब्बासी यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!