Milk Rate : दूध दराबाबत सरकारचा ‘जीआर’; खरेदी निकषांमध्ये बदल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दूध दराबाबत (Milk Rate) शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरु आहेत. आंदोलकांचा रोष पाहता आता राज्य सरकारने दूध खरेदीच्या (Milk Rate) निकषांमध्ये महत्वाचा बदल केला आहे. 3.5 फॅट व 8.5 एसएनएफऐवजी यापुढे 3.2 फॅट व 8.3 एसएनएफ या नव्या निकषानुसार राज्यातील शेतकऱ्यांकडून गायीचे दूध खरेदी केले जाणार आहे.

मागील आठवड्यात दुधाच्या दरासंदर्भात ((Milk Rate) राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूध उत्पादक शेतकरी संघटना, दूध संघांचे प्रतिनिधी आणि काही शेतकऱ्यांच्या उपस्थित बैठक झाली होती. या बैठकीत दूध दराचा निकष 3.5 फॅट व 8.5 एसएनएफवरून 3.2 फॅट व 8.3 एसएनएफ असा बदल करण्याची ग्वाही विखे-पाटील यांनी दिली होती. त्यानुसार आता हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार हा बदल करण्यात आला आहे.

म्हशीच्या दुधासाठी बदल नाही! (Milk Rate In Maharashtra)

मात्र सरकारच्या पातळीवरून दुधाच्या दराबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी 34 रुपये प्रति लिटर दूध दरासाठी शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरूच आहे. या निकषानुसार आता दूध दर ठरविले जाण्याची शक्यता आहे. कारण गायीच्या दुधाला या निकषानुसार किती दर देणार? हे निश्चित करण्यात आलेले नाही. दरम्यान, म्हशीच्या दुधासाठी 6.0 फॅट व 9.0 एसएनएफ, शेळी-मेंढीच्या दुधासाठी 3.5 फॅट व 9.0 एसएनएफ हे निकष कायम ठेवण्यात आले आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राज्य सरकारच्या या निकषामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र आता या निकषानुसार गायीच्या दुधाला किमान 34 रुपये प्रति लिटर दर मिळाला पाहिजे. अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!