Milk Rate : अरे बापरे! म्हशीच्या दुधाला मिळाला चक्क 98 रुपये दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Milk Rate : शेतीला जोडधंदा म्हणून अनेक अनेक जण दूध व्यवसाय करत आहेत. सध्याची तरुण पिढी तर आपल्याला दूध व्यवसायाकडे वळताना दिसत आहे. मात्र मागच्या काही दिवसापासून दुधाला भाव नसल्याने शेतकरी दुधाला दर मिळावे यासाठी अनेक शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. ठीक ठिकाणी आंदोलने देखील होत आहेत, या सर्व गोष्टी होत असतानाच आता पंढरपूर तालुक्या जवळ मोडनिंब येथील एका शेतकऱ्याच्या म्हशीच्या एक लिटर दुधाला जवळपास 98 रुपये 59 पैसे इतका दर मिळाला आहे. त्यामुळे आता याची सगळीकडे चर्चा होत आहे

मागच्या काही दिवसापूर्वी सरकारने दुधासाठी 34 रुपये दर निश्चित केला होता. मात्र 34 रुपये दर निश्चित करूनही तो दर मिळत नसल्याचे शेतकरी म्हणत आहेत. त्यामुळे राज्यभरातील अनेक ठिकाणी शेतकरी दुधाला दर मिळावा यासाठी सातत्याने आंदोलने करत असल्याचे देखील दिसत आहे. या आंदोलनाला दरम्यानच म्हशीच्या दुधाला 98 रुपये दर मिळाल्याने याची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. (Milk Rate)

पंढरपूर जवळच्या मोडनिंब या ठिकाणचे शेतकरी स्वप्निल शिंदे यांच्या म्हशीच्या एक लिटर दुधाला जवळपास 98 रुपये दर मिळाला आहे. हा दर अमूल दूध संकलन केंद्रात मिळाला आहे. यामुळे हा शेतकरी आनंदीत झाला आहे. त्याने आपला आनंद व्यक्त करण्यासाठी म्हशीला रंगवून शिंगावर फुगे लावून तिला पेढे भरून तिचे कौतुक केले असल्याचे देखील समोर आले आहे.

गाई म्हशींची खरेदी विक्री कुठे करणार?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला गायी किंवा म्हशीची खरेदी विक्री करण्यासाठी बाजारात जावे लागते. यासाठी जाण्याचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात होतो. मात्र आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही घरबसल्या देखील तुमच्या पशूंची विक्री करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक सोपे काम करायचे आहे. तुम्हाला पहिल्यांदा प्ले स्टोर वर जाऊन Hello Krushi हे ॲप मोबाईल मध्ये इंस्टाल करायचे आहे. हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या पशुंची खरेदी विक्री करू शकता. तुमची जर गाय विकायला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या गायीचा फोटो टाकून तिची इतर माहिती देऊ शकता. यानंतर ज्यांना कोणाला तुमची गायी खरेदी करायची आहे ते तुमच्याशी संपर्क साधतील त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप इंस्टाल करा.

error: Content is protected !!