हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मोठ्या कष्टाने दूध उत्पादन (Milk Rate) करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दूध उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठे भांडवल उभारून, जातिवंत गायीची खरेदी करावी लागते. त्यानंतर गोठा उभारणी, चारा, पाणी, पशुखाद्य, हिरवा चारा यासाठी शेतकऱ्यांना मोठी तजवीज करावी लागते. मात्र असे असूनही सध्या शेतकऱ्यांच्या दुधाला पाण्याचा भाव मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामुळे सध्या शेतकरी मोठा खर्च करूनही पाण्याच्या भावात दूध विक्री (Milk Rate) करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
चाऱ्यासह पेंढ महागली (Milk Rate Water Price For Farmers Milk)
घराबाहेर पडल्यानंतर प्रवासात अगदी सहजपणे २० रुपयात पाण्याची बॉटल खरेदी करणाऱ्यांची झुंबड आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. बाटलीबंद पाणी निर्मिती उद्योग आणि शेतकऱ्यांचे दूध उत्पादनासाठीचे (Milk Rate) कष्ट यांची तुलनाच होऊ शकत नाही. मात्र, सध्या याउलट परिस्थिती असून, एक लिटर पाण्यासाठी शुद्धीकरण सोडता अन्य कोणतेही अधिकचे कष्ट नसतात. मात्र, तेच एक लिटर दूध तयार होण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. चाऱ्याचे वाढलेले दर, सरकी पेंढ, वैरण यांचे दर गगनाला भिडले आहेत.
दुधाला 25 रुपये लिटरचा दर
मात्र असे असूनही सध्या एक लिटर दुधाला पाणी बॉटलच्या तुलनेत अगदी अल्प ५ रुपये अधिक दर (Milk Rate) मिळत आहे. अर्थात सर्वच दूध संघांकडून शेतकऱ्यांच्या दुधाची २५ रुपये प्रति लिटरने खरेदी होत आहे. तर दूध अनुदानाचे देखील भिजते घोंगडे कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांना दूध अनुदान मिळाले नसल्याचे ओरड शेतकऱ्यांकडून केली जात आहे. ज्यामुळे सध्या शेतकऱ्यांची डेअरी व्यवसायात घुसमट होत असलयाचे अनेक शेतकरी बोलून दाखवत आहे.
दूध उत्पादकांवर दुहेरी संकट
दुधाची दर घसरण कमी की काय? यावर्षी अपेक्षेपेक्षा खूपच कमी पाऊस झाला. ज्यामुळे त्याचा थेट परिणाम चारा निर्मितीवर झाला असून, राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना सध्या मोठ्या चारा टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्यस्थितीत हिरवा चारा तर मिळणे मुश्किल आहेच. शिवाय अधिकची रक्कम देऊनही सुका तसेच कोरडा चारा मिळत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. इतकेच नाही तर दूध उत्पादकांना सध्या अनेक भागांमध्ये जनावरांना पिण्यासाठी विकत पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. ज्यामुळे एकीकडे चारा, पाणी या साधनांची अनुपलब्धता त्यातच दुधाला योग्य दर मिळत नसल्याने गेल्या वर्षभरापासून दूध उत्पादक अडचणीत सापडले आहेत.