Milk Spray : पिकांवर दूध फवारणीचा देशी जुगाड; ‘पहा’ काय आहे तथ्य!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : तुम्ही कधी पिकांवर दुधाची फवारणी (Milk Spray) केलीये का? नसेल तर आज तुम्हाला आम्ही तुम्हाला पिकांवरील दूध फवारणीच्या फायद्यांबाबत सांगणार आहोत. दूध हे मानवी शरीरासाठी पूर्णान्न म्हणून संबोधले जाते. मात्र हेच दूध पिकांच्या वाढीसाठी खतांची भूमिका बजावत असते. दुधामध्ये बुरशीनाशक आणि कीडनाशक गुण सुद्धा असतात. ज्यामुळे पिकांवर दुधाची फवारणी (Milk Spray) केल्यास पिकांचे आरोग्य चांगले राहते.

फुल कुजण्यापासून बचाव (Milk Spray On Crops)

काही शेतकरी कांदा पिकावर दारूची कीटकनाशक म्हणून फवारणी करतात. मात्र, दूध फवारणी (Milk Spray) आणि दारू फवारणी हे देशी जुगाड असून, पिकांवर त्यांची फवारणी करण्याअगोदर तज्ज्ञांसोबत बोलून मगच फवारणी करावी. दुधामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असतात. दुधाचे हेच गुण मानव आणि पिकांसाठी समान उपयोगी ठरतात. पिकांच्या वाढीसाठी कॅल्शियम खूप महत्वपूर्ण मानले जाते. पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना दूध फवारणी केल्यास कॅल्शियममुळे फुल कुजण्यापासून थांबते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे टोमॅटो आणि मिरची पिकात फुल कुजण्याची समस्या असते. त्यावर दूध फवारणी प्रभावी उपाय असल्याचे काही शेतकरी सांगतात. द्राक्ष पिकावर दूध फवारणी केल्यास, बुरशीपासून बचाव करण्यास बऱ्याच प्रमाणात मदत होते. असाही काही शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

कोणते दूध वापरावे

जाणकारांच्या मते, “ताजे दूध किंवा एक्सपायर्ड किंवा पावडर अशा कोणत्याही स्वरूपात असलेले दूध फवारणीसाठी (Milk Spray) वापरले जाऊ शकते. यासाठी प्रामुख्याने मलाई काढलेले दूध वापरावे. तसेच दुधात 50 टक्के पाणी मिसळून पिकांवर फवारणी करावी. जास्त दुधाचा वापर न करता नेहमी शक्यतो खराब झालेल्या दुधाच्या वापरावर भर द्यावा. पिकांवर दुधाची फवारणी केल्यानंतर कोणत्याही रासायनिक कीटकनाशकांची किंवा खतांची फवारणी करू नये. त्यामुळे दुधातील पिकावर कार्यरत जीवाणू मरून पिकांची वाढ होणार नाही.”

पिकांवर दुधाचा वापर केल्यानंतर एक प्रकारचा दुर्गंध येऊ शकतो. मात्र काही काळानंतर त्याचे प्रमाण कमी होऊ शकते. दुधाचे हे मिश्रण शक्यतो पानांवर पडेल अशा पद्धतीने फवारणी करावी. पानांनी दूध शोषून घेतल्यानंतर, पिकांच्या वाढीला सुरुवात होते. टोमॅटोसारख्या पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे अशा पिकांना दूध फवारणी (Milk Spray) करताना फवारणी काही प्रमाणात जमिनीवर पडेल अशी फवारणी करावी. असा काही शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

(टीप – दूध फवारणी आणि दारू फवारणी हे देशी जुगाड असून, पिकांवर त्यांची फवारणी करण्याअगोदर तज्ज्ञांसोबत बोलून मगच फवारणी करावी.)

error: Content is protected !!