Milk Subsidy : दूध उत्पादक शेतकऱ्यांना 91 कोटी अनुदान वितरित; उर्वरित 165 कोटी लवकरच!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अनुदानाच्या (Milk Subsidy) प्रतीक्षेत आहे. अशातच आता दूध अनुदानाबाबत महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. दूध अनुदान वितरणाबाबतचे काम प्रगतीपथावर असून, काही अनुदान हे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहे. तर उर्वरित दूध अनुदानाचा (Milk Subsidy) निधी लवकरच वितरित केला जाईल. अशी माहिती राज्याच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास आयुक्तालयाकडून जारी करण्यात आली आहे.

दोन महिन्यासाठी अनुदान (Milk Subsidy For Dairy Farmers)

राज्यात शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला योग्य दर मिळत नसल्याने, डिसेंबर महिन्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यभर आंदोलन उभारले होते. त्यानंतर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शेतकऱ्यांना 11 जानेवारी 2024 ते 10 मार्च 2024 या कालावधीसाठी दूध अनुदान (Milk Subsidy) दिले जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात 165 कोटी रुपये मिळणार

यामध्ये 2 महिन्याच्या कालावधीमध्ये राज्यातील 6 लाख 303 शेतकऱ्यांना दूध अनुदानापोटी (Milk Subsidy) पहिल्या टप्प्यात 90 कोटी 90 लाख 85 हजार रुपये इतके अनुदान वितरित करण्यात आले आहे. त्यानंतर आता लवकरच या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील 165 कोटी रुपये इतकी रक्कम वितरित केली जाणार आहे. असे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास आयुक्तालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुणे विभाग आघाडीवर

दरम्यान, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, पुणे विभागातील शेतकऱ्यांना सर्वाधिक 95 कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यांनतर नाशिक विभागाला 62 कोटी रुपये, औरंगाबाद विभागाला 8 कोटी रुपये, नागपूर जिल्ह्याला 47 लाख रुपये, अमरावती विभागाला 1 लाख 30 हजार रुपये, कोकण विभागाला 7 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे आता पुणे आणि नाशिक विभाग दूध अनुदान मिळवण्यात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

error: Content is protected !!