Milk Subsidy : दूध अनुदानासाठी मुदतवाढ; शेतकऱ्यांना 30 एप्रिलपर्यंत दुधाची माहिती भरता येणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गायीच्या दुधाच्या अनुदानासाठी (Milk Subsidy) दूध उत्पादक शेतकऱ्यांना ११ जानेवारी ते १० मार्च या कालावधीतील माहिती भरण्यासाठी राज्य सरकारने मंगळवार (३० एप्रिलपर्यंत) मुदतवाढ दिली आहे. वंचित शेतकऱ्यांनी दूध संघांच्या माध्यमातून ही माहिती भरायची असून, ही शेवटची संधी राहणार आहे. यासाठी सरकारच्या अॅपद्वारे पशुधन, दुधासह इतर माहिती भरायची होती. पशुधन टॅगींग असणे बंधनकारक असल्याने अनेक दूध उत्पादकांची अडचण झाली होती. मात्र, आता ज्या शेतकऱ्यांना वेळेत दुधाची माहिती भरता आलेली नाही. त्यांना मुदतवाढ दिली असून, आपल्या दूध संघांच्या माध्यमातून ती भरून दूध अनुदानाचा (Milk Subsidy) लाभ घ्यावा. असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.

काय आहे ‘ही’ योजना? (Milk Subsidy For Farmers)

मागील काही महिन्यांपासून राज्यातील दूध खरेदी दरात मोठी घसरण झाली आहे. ज्यामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. अशातच दूध उत्पादक शेतकरी संघटनांनी आंदोलन करत, 34 रुपये लिटर हा राज्य सरकारने निश्चित केलेला दर प्रमाण मानला. आणि त्यानुसार गायीच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान (Milk Subsidy) देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारकडून ही योजना राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवली जात आहे. ही योजना 11 जानेवारी 2024 पासून राज्यभरात राबविली जात आहे.

फेब्रुवारी महिन्यात मुदतवाढ

दरम्यान, राज्य सरकारने यापूर्वी ही योजना 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर २६ फेब्रुवारी २०२४ रोजी पुन्हा एकदा जीआर जारी करत, राज्य सरकारने या योजनेस आणखी एक महिना मुदतवाढ दिली होती. ज्यानुसार आता राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना 11 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत दूध अनुदान (Milk Subsidy) मिळणार आहे.

error: Content is protected !!