Milk Subsidy : दूध उत्पादकांना 5 रुपये अनुदान; दुग्धविकास मंत्र्यांची मोठी घोषणा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील दूध उत्पादक (Milk Subsidy) शेतकरी मोठ्या संघर्षातून व्यवसाय करत होते. दूध दरात 27 रुपये प्रति लिटरपर्यंत झालेली घसरण त्यातच चारा, ढेप यांचे भाव गगनाला भिडले होते. मात्र आता राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रति लिटर 5 रुपयांचे अनुदान (Milk Subsidy) मिळणार आहे. अशी माहिती राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाणारी ही अनुदाज योजना (Milk Subsidy) राज्यातील केवळ सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येणार आहे. यानुसार सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.2 फॅट आणि 8.3 एसएनएफ करिता प्रति लिटर किमान 29 रुपये दूध दर देणे अपेक्षित आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 5 रुपये प्रति लिटर अनुदान जमा केले जाणार आहे. असेही दुग्धविकास मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे. दुध आणि दुग्धजन्य पदार्थाचे दर हे प्रामुख्याने मागणी-पुरवठा यांच्या गणितावर अवलंबून असतात. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात दुध भुकटी व बटरचे दर कमी जास्त झाल्यास त्याचा थेट परिणाम दूध दरावर दिसून येत असतो. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे.

हा असेल योजनेचा कालावधी (Milk Subsidy Rs 5 For Milk Producers)

थेट मदत हस्तांतरणाच्या (डीबीटी) माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते हे आधार कार्ड आणि पशुधनाच्या आधार कार्डसोबत (Ear Tagging) लिंक करणे बंधनकारक असणार आहे. त्यासाठी त्याची पडताळणी करणे गरजेचे असणार आहे. राज्य सरकारची ही दूध अनुदान योजना 1 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी लागू असेल. त्यानंतर आवश्यकतेनुसार आढावा घेऊन या योजनेला मुदतवाढ दिली जाईल. ही योजना दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या आयुक्तालयामार्फत राबवली जाणार आहे. याबाबत लवकरच शासन निर्णय काढला जाणार आहे. असेही दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!