Milk Subsidy : गाईंचे इअर टॅगिंग कसे कराल; वाचा संपूर्ण माहिती एका क्लिकवर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून दूध दराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. गायीच्या दुधासाठी सरकारने दूध अनुदान (Milk Subsidy) देण्याची घोषणा केली असून, त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी काही अटी आणि शर्ती निर्धारित केलेल्या आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना या अटींची पूर्तता केल्यानंतरच दूध अनुदान मिळणार आहे. यातील सर्वात महत्वाची अट म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या गाईंचे इअर टॅगिंग (Milk Subsidy) करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

इअर टॅगिंग म्हणजे काय? (Milk Subsidy Tagging Of Cows)

गाईंचे इअर टॅगिंग करणे म्हणजे काय तर गाईंच्या कानाला लावला जाणारा ‘पिवळा टॅग’ होय. या टॅगला एक क्रमांक असतो जो संबंधित गायीचा आधार क्रमांक म्हणून ओळखला जातो. या आधार क्रमांकाद्वारे तुमच्या गायीची संपूर्ण माहिती सरकार दरबारी असते. यात प्रामुख्याने गाईची जात, गाईचे वय, शेतकऱ्याचे नाव आणि मोबाईल क्रमांक अशी माहिती असते.

इअर टॅगिंग का महत्वाचे?

इअर टॅगिंग हे पशु उद्योगासाठी आवश्यक साधन मानले गेले आहे. शेतकऱ्यांच्या जनावरांची ओळख असलेले व्हिज्युअल इअर टॅग लागू करून, गुरेढोरे शेतकरी त्यांचे जनावरे चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकतात, अचूक नोंदी ठेवू शकतात. याशिवाय सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी हे जनावरांचे इअर टॅगिंग महत्वाचे असते. या टॅगिंगच्या माध्यमातून सरकारला गाव, तालुका, जिल्हा, राज्य स्तरांवर पशुपालकांकडे असलेल्या गाईंची संख्या किती यांची नोंद घेणे सोपे जाते. ज्यामुळे सरकारच्या योजना प्रभावीपणे राबविण्यास मदत होते.

इअर टॅगिंगसाठी कुठे भेट द्याल?

दूध अनुदान मिळवण्यासाठी गाईंचे इअर टॅगिंग करणे बंधनकारक आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात भेट द्यावी लागेल. याठिकाणी पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, यांच्याशी संपर्क करा. संबंधित अधिकाऱ्यांकडे इअर टॅगिंगची मागणी केल्यास ते तुम्हाला उपलब्ध टॅगनुसार तुमच्या गाईंला टॅग लावून देतील. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना गाईंचे इअर टॅगिंग करण्यासाठी कोणताही खर्च नसणार आहे. ही सोय पशुवैद्यकीय विभागाकडून शेतकऱ्यांसाठी निशुल्क उपलब्ध आहे.

error: Content is protected !!