Millet Corn : अबब!! हा शेतकरी पिकवतोय 5 फूट लांब बाजरीचे कणीस; कुठून आणलं बियाणं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या संपूर्ण जगाची नजर इस्राईल-हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर असून, इस्राईलमध्ये सध्यस्थितीत तणावपूर्ण परिस्थिती आहे. मात्र या तणावपूर्ण परिस्थितीतही इस्राईलने उत्तरप्रदेशातील अलिगढ येथील एका शेतकऱ्याला आनंदित केले आहे. अलिगढच्या या शेतकऱ्याने इस्राईलमधून मोठे कणीस असलेले बाजरीचे बियाणे मागवले आहे. मागील तीन वर्षांपासून हा शेतकरी इस्राईलच्या या बियाण्याचा वापर करून बाजरीचे (Millet Corn) मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. केंद्र सरकारही अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत आहे.

उत्तरप्रदेशातील अलिगढच्या लोधी परिसरातील रुस्तमपुरचे शेतकरी लव शर्मा हे मागील तीन वर्षांपासून इस्राईलमधील मोठे कणीस असलेल्या बाजरीचे बियाणे मागवून उत्पादन घेत आहेत. सुरुवातीला त्यांनी 23 एकर क्षेत्रात इस्राईलहून मागवलेल्या बाजरी पिकाची (Millet Corn) पेरणी केली. त्याद्वारे त्यांना एकरी 44 ते 48 मन इतके उत्पादन मिळाले. लव शर्मा सांगतात, भारत आणि इस्राईल यांच्यातील शेतीच्या उत्पादन खर्चात मोठा फरक नाहीये. मात्र देशी बियाणे पेरल्यास एकरी 12 ते 14 मन इतके उत्पादन मिळत असल्याचे ते सांगतात. त्यामुळे इस्राईलचे मोठ्या कणीसांचे बाजरी बियाणे वापरून आपण अधिकचा नफा मिळवत आहे.

केंद्र सरकारचेही प्रोत्साहन- Millet Corn

भारतात अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी केंद्र सरकारही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित करत आहे. 31 ऑक्टोबर रोजी क्वारसी कृषी फार्म येथे आयोजित मिलेट्स महोत्सवात सहभागी झालेल्या लव शर्मा यांनी शेतकऱ्यांना बाजरीच्या इस्राईली बियाण्याबाबत माहिती दिली. यावेळी लव शर्मा यांनी सांगितले की, देशी बियाण्यापासून उत्पादित होणाऱ्या बाजरी पिकास केवळ एक फूट इतके लांब असलेले कणीस मिळते. मात्र आपण सध्या इस्राईलच्या बाजरीच्या बियाण्यापासून जवळपास 5 फूट लांब असलेले कणीस उत्पादित करत आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!