Millets Prices : भरडधान्यांच्या दरांमध्ये वर्षभरात उच्चांकी वाढ; प्रक्रिया उद्योगातील मागणीचा परिणाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षभरात ज्वारी, नाचणी (रागी) यांच्यासह अन्य भरडधान्यांच्या (Millets Prices) दरांमध्ये 40 ते 100 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. विशेष म्हणजे उच्च गुणवत्तेच्या ज्वारीला (Millets Prices) गव्हाच्या तुलनेत सध्या 150 टक्के अधिक तर चांगल्या प्रतीच्या नाचणीच्या दरात वर्षभरात गव्हाच्या तुलनेत 45 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. यातून ज्वारी आणि नाचणीच्या मागणी आणि पुरवठ्यातील तफावत अधोरेखित होते. मागणीतील याच वाढीमुळे सरकारकडून यावर्षी आंतरराष्ट्रीय भरडधान्यवर्ष साजरे केले जात आहे.

दरवाढीमागील दुसरे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे सध्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भरडधान्यांच्या (Millets Prices) व्यवसायात उतरत आहेत. तर याउलट यावर्षीच्या खरीप हंगामात मान्सूनच्या प्रतिकूल प्रभावामुळे भरडधान्यांच्या उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात मागणी पुरवठ्यातील अंतर वाढतच गेले आहे. त्यातच भरडधान्याआधारित स्टार्टअप्सची संख्या वाढत गेल्याने पास्ता, नूडल्स, स्नॅक्स या गोष्टींसाठी ज्वारी, नाचणी यांची मागणी मोठया प्रमाणात वाढली आहे. या स्टार्टअप्सना आपल्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात या धान्यांची गरज आहे. मात्र त्या तुलनेत उपलब्धता नसल्याने ही विक्रमी दरवाढ पाहायला मिळत असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.

महिन्याभरात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ (Millets Prices Hikes In India)

धान्य बाजारातील एका आघाडीच्या कंपनीच्या दरांबाबतच्या माहितीनुसार, ज्वारी, रागी यांच्या सर्व प्रजातींच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. सरकारी शाळांमध्ये भरडधान्यांचा पुरवठा करणाऱ्या या कंपनीच्या म्हणण्यानुसार, महिनाभरात ज्वारी आणि नाचणीच्या दरांमध्ये 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या प्रमुख राज्यांमध्ये पावसाअभावी भरडधान्य पिकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये विशेषतः आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यातील भरडधान्यांचे पीक क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. एकत्रित परिणामामुळे ही दरवाढ पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!